अजूनही घराबाहेर पडत असाल तर सावधान! राज्यत मागील 24 तासात 11 कोरोना पॉझिटिव्ह..

24
0
Share:

मुंबई:राज्य सरकारकडून विविध धोरणांचा अवलंब करूनही कोरोना बाधितांची संख्या वाढतच चालली असून, महाराष्ट्रातील कोरोनाचा कालचा ५२ वरील आकडा आज ६३ वर गेला आहे . म्हणजेच मागील २४ तासात महाराष्ट्रात एकूण ११ कोरोना पॉझिटिव्ह केसेस समोर आल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ११ पैकी १० कोरोना COVID19 पॉझिटिव्ह केसेस या फक्त मुंबईतील आहेत.

महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती स्टेज २ वर असल्याचं राजेश टोपे यांनी नमूद केले. गेल्या २४ तासात वाढलेल्या ११ COVID19 पॉझिटिव्ह केसेस पैकी ८ जण परदेशातून कोरोना लागण घेऊन भारत आल्याचं देखील राजेश टोपे यांनी सांगितले. तर इतर तिघांना संसर्गातून कोरोनाची लागण झाली आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Share: