Tiktok Pro फेक लिंक पासून सावध- विशेष पोलीस महानिरीक्षक

23
0
Share:

*महाराष्ट्र सायबर विभाग*
*नागरिकांना आवाहन*

*Tiktok Pro फेक लिंक पासून सावध*
*- विशेष पोलीस महानिरीक्षक*

मुंबई दि.७– Tiktokवर बंदी घातली असली तरीसुद्धा आज ही या अँपचे अनेक वापरकर्ते व चाहते इंटरनेटवर आहेत. याचा फायदा घेण्यासाठी सायबर भामट्यांनी एक *फेक Tiktok Pro लिंक* बनविली आहे.
त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी केले आहे.
सध्याच्या काळात भारत सरकारने Tiktok सहित अन्य ५८ अँपवर बंदी घातली आहे.परंतु चाहते इंटरनेटवर आहेत. याचा फायदा घेण्यासाठी सायबर भामट्यांनी उपरोक्त फेक लिंक बनवली असून
त्याचा प्रसार व्हाट्सअँप मेसेजेस,व sms वर केला जातो.तुमची सर्व माहिती सायबर भामट्यांकडे जाते. त्या मेसेजचा एक प्रकार खालील प्रमाणे आहे.
महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते कि तुम्ही अशा कोणत्याही मेसेजच्या लिंक वर क्लिक करु नये. तसेच हे लक्षात ठेवा कि, अशा लिंक्समध्ये Malware असू शकतो. त्यामुळे यापासून सावध असावे.
तसेच केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी जे नियम व आदेश प्रसिद्ध करतील त्याचे पालन करा व गरज नसल्यास कृपया घराच्या बाहेर पडू नका. असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आले आहे.
.पाटोो

Share: