मुंबई कृषिउत्पन्न बाजार समितीचा भोंगळ कारभार !

6
0
Share:

– APMC मध्ये वरिष्ठ उप अभियंता असताना कनिष्ठ अभियंता सतीश देशमुखला मिळाली उप अभियंताची अतिरिक्त पदभार।

नवी मुंबई-मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितिच्या धान्य मार्केट मध्ये आज ( 30 नबंबर ) रोजी धान्य मार्केटमध्ये उप अभियंता म्हणून काम करणाऱ्या शँकर टोगरे यांची सेवानिवृत्त झाले यावेळी कनिष्ठ अभियंता सतीश देशमुख यांना उप अभियंताची अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला,देशमुख यांना उप अभियंताची अतिरिक्त पदभार बाजार समितीचे अधीक्षक अभियंता विलास बिरादारच्या आशीर्वाद मुळे मिळाली असे चर्चा बाजार समिती मध्ये होत आहेत .त्यामुळे इथे असा प्रश्न उपस्थित होतो की बाजार समिती मध्ये सध्या दोन वरिष्ठ उप अभियंता असताना बाजार समितीने एका कनिष्ठ अभियंता सतिश देशमुखला उप अभियंता पदभार कसा काय सोपविण्यात आला । सूत्रांनी सांगितले प्रमाणे बाजार समितीच्या धान्य मार्केट मध्ये कोट्यवधी रुपयांचे रस्त्याचे काम चालू आहे या कामावर झाकण घालण्यासाठी सतीश देशमुख यांची कनिष्ठ अभियंता वरून उप अभियंतावर नियुक्ती करण्यात आली आहे ,काही दिवसात झालेली कामाची बिल निघणार आहेत या बिल मध्ये फेडफाड करण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली अशी चर्चा बाजार समिती मध्ये होत आहेत, गंबीर बाब म्हणजे एवढ्या मोठ्या बाजार समितीमध्ये वरिष्ठ उप अभियंता असताना कनिष्ठ अभियंता सतीश देशमुखवर अधीक्षक अभियंता विलास बिरादार कसा काय कार्यभार सोपविला ही मोठी आश्चर्य चकित करत आहेत ।

Share: