कोरोनाचा मोठा धोका..नवी मुंबईत दिवसभरात 39 रुग्ण ,APMC तील 10 जणांना कोरोनाचे लागण ,रुग्णाची संख्या 289 वर.

21
0
Share:

*नवी मुंबईत करोना संसर्गाचा सर्वाधिक धोका असलेली एपीएमसी बाजारही आता करोनाचा हॉट स्पॉट होत आहे.

 

नवी मुंबई:  शहरात  दिवसेंदिवस  करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून शनिवारी 39 रुग्ण वाढले.  शहरात करोनाबाधितांची संख्या 289 झाली आहे .यामध्ये एपीएमसीत 10 रुग्ण आढल्याने एपीएमसीमध्ये  करोनाबाधित रुगणाची संख्या 48 वर पोहोचले आहेत .भाजीपला मार्केट मध्ये कोरोनाबधित व्यापाऱ्याची संपर्कात आलेल्या 6 जणांना आज कोरोना लागण झाली असून दाना मार्केट मध्ये कोरोना बाधित व्यपऱ्याला संपर्कात 2 जणांना कोरोना लागण झाली आहे तसेच फळ मार्केट मध्ये कोरोना बाधित सुरक्षा अधिकारी व ब्यापाऱ्याची संपर्कात 2 जणांना कोरोना लागण झाली आहे . यामधील भाजीपला व्यापाऱ्यांची कटुंबातील सहा जणांना कोरोना लागण झाली आहे .तसेच घणसोली मध्ये कोरोनाबधित फार्मासिस्टच्या संपर्कात  5 जणांना कोरोना लागण झाली आहे ,नेरुळ येथील बेस्ट बस कंडकटरला कोरोना लागण झाली आहे ऐरोली येथे राहणाऱ्या मुंबई पोलीस मध्ये काम करणाऱ्या कोरोना बाधित संपर्कात आल्यावर 2 जणांना कोरोना लागण झाली आहे तसेच नवी मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना कोरोनाचे लागण झाली आहे . जुईनगर मध्ये राहणाऱ्या बांद्रा बिकेसी मध्ये भाजीपला व्यापार करणाऱ्या  एका 55 वर्षीय व्यक्तीला मृत्यु झाला होता त्याचे रिपोर्ट पजिटीव्ही आल्यानंतर अंत्यसंस्कार मध्ये जाणाऱ्या लोकांना क्वारेटाईन करण्यात आली आहे.वाशीमध्ये 3, तुर्भेमध्ये 4,नेरुळ 6, कोपरखैरणेत 8,  घणसोलीमध्ये 12, ऐरोलीत 3, तर दिघा येथे 3 रुग्ण सापडले असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

नवी मुंबईत करोना संसर्गाचा सर्वाधिक धोका असलेली एपीएमसी बाजारही आता करोनाचा हॉट स्पॉट होत आहे. आज भाजीपला मध्ये 6 ,फळ मार्केट 2 व धान्य बाजारात 2 एकूण 10 नवे रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. एकमेकांना  संपर्कात आल्याने करोनाची लागण झाली होती. त्यामुळे येथील करोना रुग्णांची संख्या 48  वर  पोहोचली आहे. बाजार समिती कडून आता पर्यन्त आपल्या कर्मचाऱ्यांना , बाजारात 24×7 काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाना व बाजारात राहणाऱ्या परप्रांतीय कामगारांना  कोरोना चाचणी नझाल्याने  बाजार परिसरात भीतीचे वातावरण आहे. असे असले तरी एपीएमसीतून जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा  असल्याने अत्यावश्यक काळजी घेत बाजार सुरूच राहणार असल्याचे एपीएमसी प्रशासनाने सांगितले आहे.

 

Share: