बर्ड फ्लू मुळे ८०० कोबड्यांचा मृत्यू, बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन सतर्क !

6
0
Share:

मुंबई : परभणी जिल्ह्यातील मुरुंबा येथे,दोन दिवसापूर्वी कुकुट पालनामधील, 800 ते 900 कोंबड्या मृत झाल्याप्रकरणी अहवाल आला असून, त्यांना बर्ड फ्लू झाल्याचा सिद्ध झाला आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर परभणी येथील पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या पथकाने घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. मयत पक्ष्यांचे नमुने पुणे येथील अन्वेषण विभागाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या तपासणीच्या अहवालात या कोबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूनेच झाला असल्याचं स्पष्ट झालं आहे. यानंतर जिल्हा प्रशासनाने तत्काळ पावलं उचलायला सुरुवात केली आहे.
या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी, मुरुंबा परिसरातील आठ ते नऊ हजार कोंबड्या, नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. सोबत मुरुंबा गाव आणि परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले असून, बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी, आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. या प्रकरणी प्रशासन सतर्क झाल्याचं, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले असून, बर्ड फ्लू अटकाव घालण्यासाठी, सर्व खबरदारीचे उपाय योजले जात आहेत. सोबत नागरिकांच्या आरोग्य तपासणी साठी ही पथक परिसरात पाठविण्यात येणार असून, सर्व बाबींवर बारकाईनं लक्ष असल्याचं जिल्हाधिकारी यांनी सांगितला आहे
पशुसंवर्धन विभाग उपाययोजना करत आहे. उर्वरीत महराष्ट्रात चिकन आणि अंडी खरेदी विक्रीवर आणि खाण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. तसेच अशी आवश्यकताही नाही, असं पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे

Share: