Blood Donation Camp :रक्तदान करा आणि तांदूळ,तूरडाळ साखर व टिफिन घेऊन जा, मुंबई एपीएमसी बाजारसमिती संचालकांचा अनोखा उपक्रम

19
0
Share:
नवी मुंबई: रक्तदानाला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने अनोखा उपक्रम राबविला जात आहे .कोविडच्या काळात रक्तदान करून लोकांचे प्राण वाचूवूया आणि बाजार आवारात  रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना तांदूळ,डाळ,साखर व टिफिन भेट देण्यात येणार आहे.
राज्यात सर्वत्र रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समिती मध्ये १२ डिसेंबर रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  सकाळी आठ वाजता या शिबिराला सुरुवात होणार आहे  यावेळी रक्तदान करणाऱ्या प्रत्येकाला साखर,  तांदूळ ,डाळीचे पाकीट आणि टिफिन भेट देण्याच्या अनोखा उपक्रम राबिवला जाणार आहे अशी माहिती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे .यावेळी उपसभापती धनंजय वाडेकर,धान्य मार्केट संचालक निलेश वीरा,भाजीपला मार्केट संचालक शंकर पिंगळे, मसाला मार्केट संचालक  विजयभाई भोता,कांदा बटाटा मार्केट संचालक अशोक वाळुंज,एपीएमसी मार्केट सचिव अनिल चव्हाण व अतिरिक्त सचिव संदीप देशमुख उपस्थित होते.
अधिकाधिक लोकांनी या शिबिराला भेट देऊन रक्तदान करावे असे आवाहन बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी केले आहे .आशिया खंडातील मोठा बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाचही मार्केट आहे ,धान्य,मसाला,फळ,भाजीपाला व कांदा बटाटा प्रत्येकी मार्केटमध्ये कॅम्प लावण्यात आला आहे रक्त संकलन करण्यासाठी टाटा ,रिलायन्स, फॉरटीझ,अपॉली हस्पिटल व नवी मुंबई महापालिकाचे टीम प्रत्येक मार्केटमध्ये उपस्थित राहणार .

मसाला मार्केटमध्ये टिफिन वाटप

मसाला मार्केट सेंट्रल फॅसिलिटी बिल्डिंगमध्ये शनिवारी ता 12 रोजी सकाळी 8 ते 2 या वेळे येथे रक्तदान शिबीरांचे आयोजन केले आहे. यावेळी रक्तदान शिबीरामध्ये रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना टिफिन भेट देण्यात येणार आहे . फळ ,भाजीपाला, कांदा बटाटा व धान्य मार्केटमध्ये साखर, तांदुळ, तुरडाळीचे पॅकेट देण्यात येणार असून मसाला मार्केटच्या टिफिन भेट देण्यात असल्यामुळे यांचे  कौतुक करण्यात येत आहे , तर जास्तीत जासत रक्तदांत्यानी या शिबीरात सहभागी व्हावे असे आवाहन मसाला मार्केट संचालक विजय भुता यांनी केले आहे.

Share: