मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय,गँगस्टर अरुण गवळीची जन्मठेप कायम

19
0
Share:

मुंबई:शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाने मोठा निकाल दिला आहे. कुख्यात गँगस्टर अरुण गवळीची जन्मठेप कायम ठेवण्यात आली आहे. या खून खटल्यात एकूण 11 आरोपी आहेत. या खटल्यात अरुण गवळी आणि इतर आरोपींना मुंबई सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात सर्व दोषींनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं होतं.

या याचिकांवर तीन महिन्यापूर्वी सुनावणी पूर्ण झाली होती. आज या प्रकरणात कोर्टाने इन चेंबर निकाल सांगितला. यावेळी कोर्टाने अरुण गवळीची जन्मठेप कायम ठेवत असल्याचं म्हटलं आहे. या खटल्यात मोक्का कायदा लावण्यात आला होता. काही जनावरील मोक्का कोर्टाने हटवला आहे

काय आहे कमलाकर जामसांडे कर हत्या प्रकरण?

कमलाकर जामसांडेकर यांचा सदाशिव सुरवे नावाच्या व्यक्तीशी संपत्तीवरुन वाद होता. त्यानंतर सदाशिवने अरुण गवळीच्या गँगमधील 2 व्यक्तींना जामसांडेकर यांची हत्या करण्यास सांगितले. दोघांनी सदाशिवची अरुण गवळीशी भेट घालून दिली. गवळीने हे करण्यासाठी 30 लाखांची सुपारी मागितली. सदाशिवने होकार दिल्यावर गवळीने आपल्यावर संशय येऊ नये म्हणून प्रताप गोडसेला जामसांडेकर हत्येसाठी नवे शूटर शोधण्यास सांगितले. गोडसेने नवे शूटर शोधण्याचे काम श्रीकृष्ण गुरव या दुसऱ्या साथीदाराकडे दिले. श्रीकृष्णने नरेंद्र गिरी आणि विजयकुमार गिरी यांची निवड केली. तसेच त्यांना प्रत्येकी अडीच लाख रुपये देण्याचे कबूल केले. यापैकी त्यांनी प्रत्येकी 20 हजार रुपये अॅडव्हान्सही दिला.

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, विजय कुमार गिरीने अशोक कुमार जायसवार या सहकाऱ्यासह जवळजवळ 15 दिवस कमलाकर जामसांडेकरवर लक्ष ठेवले. त्यानंतर 2 मार्च 2007 ला जामसांडेकर यांची त्यांच्या राहत्या घरी हत्या केली. गवळीला या घटनेनंतर 1 वर्षांनी पकडण्यात आले. तत्कालीन गुन्हे शाखेचे प्रमुख राकेश मारिया, अतिरिक्त पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस निरिक्षक दिनेश कदम, धनंजय दौंड, नीनाध सावंत, योगेश चव्हाण यांच्या पथकाने अरुण गवळीला अटक केली होती.

Share: