Breaking: Apmc मार्केट तर सुरू झाले…पण मजूर व ग्राहक नसल्याने माल तसाचं पडून आहेत.

22
0
Share:
नवी मुंबई :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढता प्रादुर्भाव पाहता 11 मे ते 17 मे या कालावधीत नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट बंद करण्याचा निर्णय प्रशासन व बाजार समितीच्या माध्यमातून घेण्यात आला होता.त्यानुसार सात दिवस मार्केट बंद ठेवून आज अखेर मार्केट सुरू करण्यात आले आहे, मात्र ग्राहक व मजूर नसल्याने भाजीपाला मार्केटमधील माल तसाच पडून आहे.
नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोना चे संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आतापर्यंत 380 जणांना कोरोनाची लागण झाली आहे त्यामध्ये व्यापारी,माथाडी,मापाडी,कार्यालयीन कर्मचारी, सुरक्षा रक्षक, ग्राहक, दलाल, व निकटवर्तीयांना कोरोनाची बाधा झाली आहे. एपीएमसी मार्केटमध्ये वाढता कोरोनाचा प्रसार रोखता यावा, त्या अनुषंगाने 11 मे ते 17 मे या कालावधीत सात दिवस मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
त्यानुसार सात दिवस पूर्ण झाल्यानंतर आज सोमवारी 18 मे पासून मार्केट सुरू करण्यात आले आहे आजपासून सुरु करण्यात आलेल्या मार्केटमध्ये भाजीपाला मार्केट अन्नधान्य मार्केट मसाला मार्केट यांचा समावेश आहे. आज भाजीपाला मार्केटमध्ये 92 गाड्यांची आवक झाली आहे.
मात्र बाजार समितीत माल उचलण्यासाठी मजूर व माल घेण्यासाठी ग्राहक नसल्याने बाजार समितीमध्ये कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, वांगी व इतर भाज्या तशाच पडून आहेत. तसेच खूप दिवसांनी मार्केट सुरू झाल्यानंतर बाजार समितीकडून काळजी घेण्यात येत असून  मार्केट च्या प्रवेशद्वारावर येणाऱ्या ग्राहकांची स्क्रीनिंग टेस्टिंग करण्यात येत आहे आतापर्यंत 1999 लोकांची तपासणी करण्यात आली आहे यामध्ये दहा जणां मध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांची रवानगी रुग्णालयात करण्यात आली.
Share: