Breaking: COVID 19 टास्क फोर्सचे प्रमुख डॉ संजय ओक कोरोना पॉझिटीव्ह

19
0
Share:

मुंबई: कोरोनाविरूद्धचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील नामवंत आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेमलेल्या टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनाच आता करोनाची लागण झाली आहे. संजय ओक यांच्यावर मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांना ऑक्सिजन देण्यात आला आहे.

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि प्रत्यक्ष उपचार करणार्‍या डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्य सरकारने एप्रिलमध्ये विशेष टास्क फोर्स स्थापन केले. या टास्क फोर्सकडून राज्यातील संपूर्ण करोना परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत होते. अशा या टास्क फोर्सच्या प्रमुखपदी डॉ. संजय ओक यांची नियुक्ती करण्यात आली होती. या टास्क फोर्सचे प्रमुख असलेल्या संजय ओक यांना करोनाची लागण झाली आहे. डॉ. ओक यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना बुधवारी तातडीने फोर्टीस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ओक यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना ऑक्सिजन देण्यात आला असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर राज्याचे मुख्य सचिव, पालिका आयुक्त यांच्या कोरोनासंदर्भात होणार्‍या बैठकांमध्ये डॉ. संजय ओक हे टास्क फोर्सचे प्रमुख असल्याने सहभागी होत असे. ओक यांचा अनेक महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क आला आहे.

Share: