BREAKING NAVI MUMBAI: नवी मुंबई मधून ‘तबलीग जमाती’ मध्ये गेलेल्या 2 जणांना कोरोना पजिटीव्ही, त्या 17 जणामुळे नवी मुंबईकर टेन्शनमध्ये

31
0
Share:

BREAKING NAVI MUMBAI
नवी मुंबई मधून तबलीग जमाती मध्ये गेलेल्या 2 जणांना कोरोना पजिटीव्ही, त्या 17 जणामुळे नवी मुंबईकर टेन्शनमध्ये

-नवी मुंबईत आणखीन आढळले 2 कोरोना रुग्ण.
-एकूण कोरोना रुग्णाचा आकडा 13 वर गेला आहे

नवी मुंबई : दिल्ली येथे ‘तबलिगी जमात’ या सुन्नी मुस्लीम समाजाच्या धार्मिक संघटनेने आयोजित केलेल्या संमेलनात नवी मुंबईतील 17 मुस्लिमांनी सहभाग घेतल्याचे पुढे आले आहे. यापैकी 3 जणांचा शोध लागला असून त्यांना होम क्वारेटाईन करण्यात आले आहे त्यामध्ये 2 जणांना कोरोंना पोजिटीव्ही आले आहे यातील 14 जण अजून परत न आल्याने पालिका प्रशासन व पोलीस या 14 जणांना कसून शोध घेत आहेत, या संमेलनात भाग घेतलेल्यांपैकी देशभरातील 10 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे त्यामुळे नवी मुंबईकरांचे टेन्शन वाढले आहेत.नवी मुंबईत एकूण कोरोना रुग्णाचा आकडा 13 वर गेला आहेत .
देशावर कोरोनाचे संकट घोंघावत असताना दिल्लीत ‘तबलिगी जमात’ या सुन्नी मुस्लीम समाजाचे 13 मार्च ते 15 मार्च असे अधिवेशन दिल्लीच्या निजामुद्दीन मर्कजमध्ये भरवले होते. या तारखेच्या आधीपासून देश-विदेशातू सुन्नी मुस्लीम प्रतिनिधी दिल्लीत दाखल होत गेले. किमान 2000 सुन्नी प्रतिनिधींपैकी सोमवारी एकाच दिवशी 24 जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.तबलिगीमध्ये नवी मुंबईतील 17 जण सहभागी झाल्याचे समोर आले आहे. त्यातून 3 जण परत आल्यावर त्याला महानगरपालिका तर्फे होम
क्वारेटाईन करून ठेवण्यात आला होता आणि त्यांचे नमुने तपासणी साठी पाठवण्यात आला होता या मध्ये दोघांना पोजिटीव्ही आले आहे तर 14 जण अजून आलेले नाही .नवी मुंबईतील जे 17 जण आहेत, त्यांची व त्यांनी जिथे वास्तव्य केले आहे त्यांची वैद्यकीय तपासणी सुरु करण्यासाठी पालिका प्रशासन कमला लागले आहे. कोरोनाचा फैलाव इतरत्र तेजीने होत असताना, नवी मुंबई मध्ये कोरोनाचे रुग्ण नव्हता फिलिपीन्स नागरिकचा संपर्कात आल्यावर वाशी मध्ये नूर मशिदीच्या मौलवी मुळे नवी मुंबई मध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसात वाढत होते आता दिल्ली येथे ‘तबलिगी जमात’ या सुन्नी मुस्लीम समाजाच्या धार्मिक संघटनेने आयोजित केलेल्या संमेलनात नवी मुंबईतील 17 मुस्लिमांनी सहभाग झाले होते त्यातच दोघांना कोरोना पजिटीव्ही आढल्याने याची चिंता नवी मुंबई पालिका प्रशासन आणि नवी मुंबईकरांना लागून राहिली आहे.

Share: