महापालिकेसाठी प्रकल्प आणा, तात्काळ मंजूर करू,उद्धव ठाकरे

23
0
Share:

“मुंबई महापालिकेसाठी प्रकल्प आणा, तात्काळ मंजूर करून देणार मी मुंबईचा मुख्यमंत्री आहे. आजपर्यंत सोहळा टीव्हीवर पाहत होतो. पण तुमच्यामुळे शिवाजी पार्कवर ध्वजारोहण करता आले. पूर्वीच्या सुविधा कमी पडत असल्याने नव्या पायाभूत सुविधा निर्माण करत आहोत. शहरांतर्गत वाहतूक व्यवस्था भक्कम करतोय आणि आता तर सरकार आपल्याकडं आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज मुंबईतील महत्त्वाच्या लोअर परळ पुलाचं भूमीपूजन करण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या लोअर परळच्या पुलाचं काम अखेर सुरू होतं आहे. त्याशिवाय संत गाडगे महाराज चौक सातरस्ता या ठिकाणी दोन पुलांचंही भूमीपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं.

केशवराव खाड्ये मार्गावर हाजी अलीच्‍या दिशेने जाणाऱ्या आणि संत गाडगे महाराज चौक सातरस्ता इथून धोबी घाटमार्गे डॉ. ई. मोजेस मार्ग येथे म्हणजे वरळी नाका दिशेनेदेखील पूल बांधण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांच्या आधुनिक प्रदर्शन कक्षाचे लोकार्पण केले आणि भक्तीपार्क उद्यान येथील मियावाकी पद्धतीने वनीकरणाचा शुभारंभ केला.

 

Share: