मकर संक्रांतीला महागाईची झळ,तिळाचे दर वाढले

6
0
Share:

रेश्मा निवडूंगे-एपीएमसी न्युज

नवी मुंबई: संक्रांत काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.संक्रातीला तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणून शुभेच्छा दिल्या जातात.तिळाच्या उत्पन्नात घट झाल्यामुळे यंदा तिळाचे दर वधारले आहेत.२५ ते ३० रुपयांनी तीळ महागला आहे.

संक्रातीला तिळाचे फार महत्त्व आहे.हा काळ थंडीचा असतो त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळा चा आहारात समावेश करण्यात येतो.तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ म्हणजे स्निग्धता.स्नेहाची गोडी वाढवावी हा त्याचा हेतू.गेल्या वर्षी तीळा ला कमी भाव मिळल्यामुळे यंदा तिळाच्या उत्पन्नात घट झाली आहे.त्यामुळे यंदा २५ ते ३० रुपयांनी तीळ महागला आहे.संक्रातीला तीळाचे लाडू,वड्या,तीळ पापड घरोघरी बनवून वाटप केली जाते.त्यामुळे तिळाच्या मोठ्या प्रमाणात मागणी आहे.आफ्रिका सारख्या देशातून देखील तीळाचे उत्पन्न घेतले जाते.मागील वर्षी २० लाख ९३ हजार टन उत्पादन घेण्यात आले होते तर यावर्षी १९ लाख ५९ हजार टन उत्पादन घेण्यात आले आहे.तुर्भे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या
राजस्थान वरून तिळाची आवक होत आहे.तिळाचा सध्या घाऊक बाजारपेठेत तीळाचे दर प्रति किलो १४० ते १५० रु आहेत तर किरकोळ बाजारात १८० रु प्रति किलोवर दर पोहचले आहेत.चिक्की गुळाचे दर घाऊक बाजारात ४०-४५ रु प्रति किलो आहेत तर किरकोळला ६० रु प्रति किलो आहेत.काळा ऑरगॅनिक गुळाचे दर घाऊक बाजारात ५० रु प्रति किलो आहेत.हा गूळ कोल्हापूरवरुन येत असल्याचे तीळ गुळाचे व्यापारी विजय पटेल यांनी सांगितले.सध्या रेडिमेड कडक लाडू चे दर प्रति किलो १४० रु तर नरम लाडू २०० रु प्रति किलोवर आहेत.

Share: