कोरोनासाठी मध्य रेल्वे सज्ज,संपूर्ण यंत्रणा तयार

16
0
Share:

मुंबई : कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने (Central railway on Corona Virus) या आजाराचा सामना करण्यासाठी उपाययोजना आखल्या आहेत. याबाबत त्यांनी प्रसिद्ध पत्रक जारी केलं असून माहिती दिली आहे. कोरोना विषाणू (कोविड-19) विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्यासाठी मध्य रेल्वेने संपूर्ण यंत्रणा तयार केली आहे (Central railway on Corona Virus).

मध्य रेल्वेच्या सर्व स्तरांवर या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. यासाठी नियंत्रण कक्षांची स्थापना करण्यात आलेली आहे आणि कर्मचार्‍यांना या विषयाबद्दल संवेदनशील आणि शिक्षित केले गेले आहे. संबंधित आरोग्य अधिकार्‍यांचे सहकार्य आणि समन्वय देखील सुनिश्चित केलं जात आहे, अशा माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

कोरोना रोखण्यासाठी मध्य रेल्वेनेच्या उपाययोजना

1. रेल्वे स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये पोस्टर्स आणि पत्रकेद्वारे कोरोनाबाबत जनजागृती केली जात आहे. याशिवाय जनजागृती करण्यासाठी रेल्वे स्थानकांवर ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप्स दाखविल्या जात आहेत. स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये उद्घोषणा केल्या जात आहेत.

2. भायखळा, कल्याण, भुसावळ, सोलापूर, नागपूर आणि पुणे येथील रेल्वे रुग्णालयांना कोरोना विषाणूच्या संशयास्पद घटनांचा उपचार करण्यासाठी आवश्यक आणि संरक्षणात्मक उपकरणे उपलब्ध करुन देण्यासाठी वेगळे वॉर्ड उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

3. वैद्यकीय कर्मचार्‍यांना सूचना देण्यात आल्या आहेत की, कोरोना आजाराचा कोणताही संशयित रुग्ण आढळल्यास अथवा नोंदवले गेल्यास तातडीने रेल्वे रुग्णालय किंवा आरोग्य युनिटमध्ये तसेच त्या बाबतीत रेल्वे बोर्ड आणि स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांना कळविण्यात यावे.

4. रुग्णालयातील सर्व वैद्यकीय प्रभारींना संबंधित राज्य अधिकाऱ्यांशी सतत संपर्क ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अशा राज्य अधिकाऱ्यांनी सुचविलेले या विषयावरील मार्गदर्शक सूचना किंवा अद्यतने मिळवून आवश्यक शोध, प्रतिबंध आणि उपचारात्मक उपाय करावेत.

Share: