अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी आजपासून सुरुवात – औरंगाबाद व उस्मानाबाद येथे केंद्रीय पथक

16
0
Share:

उस्मानाबाद: ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात अतिवृष्टीने झालेल्या नुकसान झालेल्या पिकाची व भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आजपासून पाहणी दौऱ्याला सुरुवात करीत असून आज औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्ह्यात पाहणी करणार आहे.

या पाहणी पथकात  NDRFचे सहसचिव रमेशकुमार , केंद्रीय ग्रामविकास खात्याचे उपसचिव यशपाल , अर्थ मंत्रालयाचे सल्लागार आर बी कौल , नागपूर कृषी विभागाचे संचालक आर पी सिंग , मुख्य अभियंता तुषार व्यास , अधीक्षक अभियंता महेंद्र सहारे या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अधिकाऱ्यांच्या 2 वेगवेगळ्या टीम आज उस्मानाबाद व औरंगाबाद भागात पाहणी करून पंचनामे , छायाचित्र व स्थळपाहणी करणार आहेत.

उस्मानाबाद तालुक्यातील पाटोदा , लोहारा तालुक्यातील सास्तुर , राजेगाव , तुळजापूर तालुक्यातील काक्रबा , अपसिंगा व कात्री भागाची पाहणी करणार आहेत. ऑक्टोबर महिन्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील 4 लाख 1 हजार 881 शेतकऱ्यांच्या 2 लाख 59 हजार 255 हेकटर क्षेत्रातील पिके व फळबागांचे नुकसान झाले होते. सोयाबीन , उडीद , मूग , तूर , कापूस पिकासह पपई , ऊस व फळबागांचे नुकसान झाले असून पावसाने अनेक शेतकऱ्यांची शेती वाहून गेली तर अनेक घरांची पडझड झाली आहे मात्र अद्याप मदत मिळालेली नाही. राज्य सरकारकरून पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद जिल्ह्यात 133 कोटींची तुटपुंजी मदत तर भरीव मदतीची प्रतीक्षा आहे.

केंद्राचे पथक 21 ते 26 डिसेंबर दरम्यान राज्यात विविध भागात जाऊन पाहणी करणार आहे.केंद्राचे पथक 21 डिसेंबर रोजी मराठवाड्यातील उस्मानाबाद व  औरंगाबाद जिल्ह्यात पाहणी करणार आहे. 22 डिसेंबर रोजी सोलापूर व पुणे येथे तर 23 डिसेंबर रोजी पुणे येथे नुकसान आढावा बैठक घेणार आहे. 24 डिसेंबर रोजी गडचिरोली व नागपूर , 25 डिसेंबर रोजी चंद्रपूर व भंडारा आणि 26 डिसेंबर रोजी नागपूर येथे आढावा बैठक घेऊन हे पथक दिल्लीकडे रवाना होणार आहे. मराठवाडा , नागपूर व पुणे भागात अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे.अतिवृष्टी होवून 2 महिने झाल्यानंतर केंद्राचे पथक येणार असून अनेक शेतकऱ्यांनी शेतीची दुरुस्ती केली आहे तर पिके काढून टाकली आहेत

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस , प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक मंत्री व नेत्यांनी पाहणी केली आहे.

Share: