आंध्रप्रदेश राज्याला विशेष दर्जा न देण्याच्या कारणावरून चंद्राबाबू नायडू याचं एक दिवसीय उपोषण सुरू.

21
0
Share:

विशेष राज्याचा दर्जा न देण्याची भूमिका मोदी सरकारने घेतल्याच्या विरोधात नायडू यांनी दिल्लीमध्ये एकदिवसीय उपोषणाला सुरुवात केली.
चंद्राबाबू नायडू यांनी ‘आज आपण येथे सगळे केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी गोळा झालो आहोत. आपल्या आंदोलनाच्या एक दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे गेले होते. याची गरजच काय असं मला विचारायचं आहे’, असा प्रश्च विचारला आहे. तसेच ‘जर तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर त्या कशा पूर्ण करायच्या आम्हाला चांगलंच माहीत आहे. हा आंध्रप्रदेशातील लोकांच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. जेव्हा कधी आमच्या स्वाभिमानावर हल्ला होईल आम्ही सहन करणार नाही. मी सरकारला आणि खासकरुन पंतप्रधानांना चेतावणी देत आहे की एकट्यावर हल्ला करणं थांबवा’, असा इशारा चंद्राबाबू नायडू यांनी दिला आहे

Share: