छगन भुजबळांचा राज ठाकरेंना टोला,तलवारी जुन्या झाल्या आता नवे शस्त्र आले.

23
0
Share:

नवी मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महामोर्चानंतर आझाद मैदानात भाषण केलं. या भाषणात त्यांनी “दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल”, असा इशारा घुसखोरांना दिला होता. त्यांच्या याच इशाऱ्यावरुन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी चिमटा काढला. “देशात लोकशाही आहे. तलवारी वगैरे फार जुन्या झाल्या आहेत. आता नवे शस्त्र आले आहेत”, असा टोला छगन भुजबळ यांनी राज ठाकरेंना लगावला.

नवी मुंबईतील एका कार्यक्रमात भुजबळ बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,शशिकांत शिंदे,गणेश शिंदे,महापौर जयवंत सुतार आणि आमदार मंदा म्हात्रे उपस्थित होते. यावेळी छगन भुजबळ यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली .

“कोण कुणाला पाठिंबा देईल आणि कोण कुणाला विरोध करेल, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उद्धव ठाकरे यांनी एनआरसी महाराष्ट्रात लागू करु देणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली आहे. तिच भूमिका आमचीसुद्धा आहे”, असं छगन भुजबळ म्हणाले.

“देशाच्या नागरिकांना त्रास होणार नाही. जे खरेखुरे देशाचे नागरिक आहेत त्यांची सोय प्रथम केली पाहिजे”, असंदेखील मत भुजबळ यांनी व्यक्त केलं.

“मी ज्यावेळी गृहमंत्री होतो तेव्हादेखील घुसखोरांची समस्या होती. पोलीस घुसखोर बांगलादेशींना परत बॉर्डरवर सोडून येतात. पण घुसखोर पुन्हा येतात. आता त्यांना रोखणं भारत सरकारचं काम आहे. केंद्र सरकारने सीमेवर सुरक्षा वाढवावी किंवा दुसरी काहीतरी सुरक्षित उपाययोजना करावी”, असा सल्ला छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारला दिला.

अनेक जण जागा घेतात जमिनी घेतात मात्र जागेच काय करतात हे देवच जाणे..रक्तदानाच्या बाबतीत मी इतकंच सांगतात या सगळ्या दानात सगळ्यात श्रेष्ठ दान हे रक्तदान आहे. अवयव दानही अंत्यत श्रेष्ठ आहे. डॉक्टरांच्या भूमिके इतकचं योग्य औषधं देणे ही अंत्यत महत्वाचे. योग्य औषधं न घेतल्याचा परिणाम मी स्वतः भोगला आह महाराष्ट्र मधील कोणत्याही लोकांना त्रास होऊ लागला तर त्यावर एकच उपाय पवार साहेब.दिल्लीच्या बंगल्या वर पवार साहेबांच्या सर्व पक्षाचे लोक आहे राजकारणातील सर्व प्रश्न असल्याने आम्ही सरकार मध्ये आले. सगळ्याच हृदयस्थान पवार साहेब आहेत त्यांना मारणार असं बोलण्याची काही लोकांची हिंमत तरी कशी होते.पवार हे महाराष्ट्र व देशाचे गोरगरिबांचे त्रास दूर करण्यासाठी आहेत. पवार साहेबांना जो त्रास आहे असा त्रास कोणाला असेल तर ती व्यक्ती घराबाहेर पडली नसती मात्र तरीही लोकांची ते काम करत आहेत अस छगन भुजबळ म्हणाले.
देशात कुठेही संकट आले तर केमिस्ट असोसिएशन ही संघटना हजर असते .महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील माणस वारीला जात असतात. वारकरीना मदत करण्यासाठी काही संस्था हजर असतात.त्यावेळीही ही संघटना हजर असते. कचरा वेचक महिलांनाही हॅण्ड ग्लोसज दिले जातात..संकटमोचक म्हणून पवार यांनी उल्लेख केला.डॉक्टरचा सल्ला कधी सोडायचा नाही असा मिश्कील  टोला त्यांनी शरद पवार यांनी मारला.ऑनलाइन औषध  देण्यासंबधी केंद्र राज्य सरकारने विचार करावा. असेही त्यांनी म्हंटले.माणसाचे प्राण वाचवणे या सारखे मोठे पुण्याचे काम नाही असे यावेळीपवार यांनी म्हंटलं.
Share: