नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधानांना पत्र

8
0
Share:

सोलापूर : राज्यभरात परतीच्या पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. तसेच याआधी झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे देखील तब्बल २७ हजार कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. त्याचबरोबर जुलै ते सप्टेंबर या काळातील एकूण झालेल्या नुकसानीचे एकत्रित पंचनामे करुन त्याचा अहवाल लवकरात लवकर सादर करावा, असा आदेश मदत व पुनर्वसन विभागाने दिला आहे. तसेच केंद्र सरकारने नुकसान भरपाईसाठी ‘एनडीआरएफ’मधून मदत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

परतीचा पाऊस मोठा झाल्याने राज्यातील एकूण १७ जिल्ह्यांमधील ७० हजारांहून अधिक हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात सोयाबीन, तूर, कांदा, टोमॅटो, कापूस, ऊस या पिकांसह फळबागांचा समावेश आहे. परंतु तरी देखील काही जिल्ह्यांमध्ये नुकसान होऊनही पंचनाम्याला सुरुवात झालेली नाही. काही दिवसांत कारखान्याला जाणारा ऊस, नुकतीच टोमॅटोची केलेली लागवड, कांदे पावसात वाहून गेले. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच आश्‍वासन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले आहे. मात्र, राज्याची आर्थिक स्थिती बिकट असल्याने ही मदत केंद्र सरकारने ‘एनडीआरएफ’मधून द्यावी, अशी मागणीही करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

पावसामुळे ज्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे ३३ टक्‍क्‍यांहून अधिक नुकसान झाले आहे, त्यांना राज्य व केंद्र सरकारकडून मदत दिली जाणार आहे. नुकसानीचे पंचनामे अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकसानग्रस्तांना ‘एनडीआरएफ’मधून मदत मिळावी, असा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविला जाईल. असे, सुभाष उमराणीकर, उपसचिव, मदत व पुनर्वसन सांगितले.

Share: