मुंबई Apmc भाजीपला मार्केटमध्ये 60 रुपये दराने विकली जाणारी कोथिंबीर आता 5 रुपयात!

24
0
Share:

नवी मुंबई: आज भाजीपाला मार्केटमध्ये जवळपास 500 गाड्याची आवक झाली. मुबंई एपीएमसी घाऊक बाजारात आज कोथिंबीरच्या 31 गाड्याची आवक झाली. मागील एक महिन्यापासून 60 ते 80 रुपये दराने विकली जाणारी कोथिंबीर जुडी आज 5 रुपये दराने बाजारात विकली जात आहे. पण ग्राहक नसल्याने कोथिंबीरच्या जुड्या बाजारात अश्याच फेकण्यात आल्या आहेत.

तसेच घाऊक बाजारात भाजीपाल्याच्या दारात देखील घसरण झाली आहे. मेथी 15 रुपये जुडी, पालक 8 रुपये जुडी, शेपू 10 रुपये जुडी या दराने बाजारात विकली जात आहे.

वाटाणा 80, तर भेंडी 35 रुपये किलो.

आजचा भेंडी चा भाव *35* रुपये किलो, कारली *35* रुपये किलो, वाटाणा *80* रुपये किलो, टोमॅटो *30* रुपये किलो, वांगी *30* रुपये किलो,दुधी भोपळा *35* रुपये किलो हा भाव सध्या बाजारात विक्रीसाठी चालू आहे.

*भाजीपाला* *प्रतिकिलो*
*भेंडी* *35*
*फ्लॉवर* *24*
*टोमॅटो* *30*
*वाटाणा* *80*
*वांगी* *30*
*कोबी* *10*
*दुधी भोपळा* *35*
*कारली* *35*

 

Share: