दिवाळीनिमित्त मिठाईऐवजी नागरिकांची सुक्या मेव्याला पसंती; दहा दिवसांत 140 कोटींची उलाढाल !

15
0
Share:
नवी मुंबई : मुंबई व नवी मुंबईकरांमध्ये मागील काही वर्षांपासून आरोग्याविषयी जागरूकता वाढत आहे. तसेच कोरोनाच्या सावटाखाली यंदा दिवाळी साजरी करावी लागणार आहे. कोरोना असल्यामुळे वारंवार लोकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात असून नागरिकही आरोग्याविषयी जागरूक असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाकाळात आशिया खंडातील मोठा बाजारपेठ मध्ये असलेल्या ड्रायफ्रूट मार्केटमध्ये काजू आणि बदाम मध्ये 50 टक्के घसरण झाल्याने यंदा दिवाळीसाठी आरोग्याची काळजी घेत मिठाईपेक्षा सुका मेव्याला नागरिकांकडून पसंती दिली जात आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या दहा दिवसांमध्ये तब्बल 3700 टन सुका मेव्याची विक्री झाली असून तब्बल 2250 टन साखरेची आवक झाली आहे. त्याचबरोबर खजूर व खारिकच्या विक्रीमध्येही वाढ झालेली बघायला मिळत आहे.
दिवाळी म्हटली की फराळ, आणि मिठाई आलीच परंतु यंदा दिवाळीमध्ये मिठाईऐवजी सुका मेवा, खजूर, खारीक यांना नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जात आहे. संपूर्ण राज्यासह गुजरामध्ये मुंबईमधून सुका मेवा पाठवला जातात असून, सध्या जगभरातून मुंबईमध्ये सुका मेवा विक्रीसाठी येत असतो. मात्र शासनाच्या नियमांमुळे मुंबई व इतर ठिकाणी परस्पर  माल जाण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे बाजार समितीवर याचा परिणाम झाला आहे. दिवाळीनिमित्त मागील दहा दिवसांमध्ये  तब्बल 3700 टन सुका मेव्याची विक्री झाली असून 1480 टन बदामची विक्री झाली आहे. तर खजूर, पिस्ता, खारीक, आक्रोड, व काजूची नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.
मागील दोन महिन्यांनपासून मुंबई बाजार समितीमध्ये सुक्या मेव्याचा बजाव स्थिर असून गेल्या दहा दिवसांमध्ये सुका मेव्याच्या विक्रीतून जवळपास 140 कोटींची उलाढाल झाली असून एपीएमसीच्या बाहेरही कित्येक कोटी रुपयांची उलाढाल या व्यवसायातून झाली आहे. अनेक कंपन्यांनमध्ये व्यावसायिक, राजकीय पदाधिकारी तसेच कॉर्पोरेट कंपन्यांनी त्यांच्या येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना  दिवाळीनिमित्त भेट देताना गोड मिठाईऐवजी सुका मेव्याला पसंती देत आहेत.
 *बाजारात 60 टक्के चायनाच्या वस्तू विकल्या जात आहेत
दिवळीनिमित्त बाजारात आकर्षक लायटिंग्स व पणत्या आल्या आहेत. बाजारपेठेत विविध प्रकारचे आकाशकंदील लावण्यात आले असून यंदा नागरिकांनी चायनाच्या वस्तूंवर बहिष्कार करत भारतीय बनावटीच्या गोष्टी खरेदी करण्याकडे कल दिला आहे. परंतु काही ठिकाणी चायनाच्या उर्वरित वस्तू असल्याने त्या विकण्यात येत आहेत. बाजारात सध्या 60 टक्के चायनाच्या गोष्टी विकल्या जात असून 40 टक्के भारतीय बनावटीच्या गोष्टी विकल्या जात आहेत. एकीकडे चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकल्याचे बोलले जात असला तरी अजूनही मोठ्या प्रमाणावर बाजारात चायनाच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
 *ड्रायफ्रुट्सचे दर घसरले
दिवाळी सण म्हटला की घरगुती स्वरुपाच्या वस्तु तयार करण्यासाठी गृहीणीवर्गाकडुन खरेदीसाठीचे नियोजन सुरु केले जाते. लाडू, शंकरपाळे, करंजी, पुरी, चकली या व अशा इतर वस्तुंसाठी नमुद वस्तु दर्जेदार पद्धतीच्या खरेदीसाठी ग्राहकांचा कल असतो. तसेच दिवाळीत ड्रायफ्रुटस मोठ्या प्रमाणात एकमेकांना भेट दिले जातात. यंदा ड्रायफ्रुट्सचे दर घसरले असून ड्रायफ्रुट्सचा राजा मानला जाणाऱ्या काजूचे दर हे ५० टक्क्यांनी खाली घसरले आहेत. यंदा काजू ४५० प्रतिकिलो दराने विकला जात असून मागील वर्षी काजूची किंमत ८०० रुपये प्रतिकिलो होती. तसेच बदाम व खजुराच्या किंमतीतही ३० ते ४० टक्क्यांची घसरण झाली आहे.
Share: