साडेतीनशे वैयक्तिक पाणी योजना बंद

21
0
Share:

दुष्काळाच्या तीव्रतेचे परिणाम आता दिसू लागले आहेत. पाणी पातळी खालावत असल्यामुळे जलस्त्रोत अटत आहेत. त्यामुळे वैयक्तिक पाणी पुरवठा योजना बंद पडू लागल्या आहेत. आतापर्यत सुमारे ३८८ पाणी योजना बंद पडल्या असून त्यातील ३४९ पाणी योजना केवळ जलस्त्रोत आटल्याने बंद पडल्या आहेत, असे ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील सुत्रांनी सांगितले.

जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती आहे. पावसाळ्यात पुरेसा पाऊस झाला नसल्याने पाणी पातळी उंचावण्याला फारसी मदत झाली नाही. नदी, नाले, तलाव व अन्य जसस्त्रोतही कोरडेच राहिले. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. ग्रामीण भागात सध्या गंभीर पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. बहुतांश तालुक्यात टॅंकरने पाणी द्यावे लागत आहे.

जिल्ह्यामध्ये १४२५ वैयक्तिक पाणी पुरवठा योजना आहेत. मात्र यंदा पाणी नसल्याने जलस्त्रोत आटू लागले आहेत. त्यातच उन्हाचा चटका वाढू लागल्याने जलस्त्रोत अटत असलेल्या भागातील वैयक्तीक पाणी बंद पडू लागल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून गाव पातळीवर पाणी टंचाई तीव्र होऊ लागली आहे. सर्वाधिक वैयक्तीक पाणी पुरवठा नळयोजना पाथर्डी, पारनेर, कर्जत, जामखेड तालुक्यात बंद पडू लागल्या आहेत. श्रीरामपुर, राहुरी, राहाता, कोपरगाव भागात मात्र अजून परिस्थिती बरी आहे.

Share: