Apmc News Breaking: उद्या पासून भाजीपाला बाजारात किरकोळ व्यापाऱ्यांना प्रवेश बंद,एपीएमसी प्रशासनाने घेतला मोठा निर्णय.

19
0
Share:

उद्या पासून भाजीपाला बाजारात किरकोळ व्यापार्यांना प्रवेश बंद,एपीएमसी प्रशासनाने घेतला मोठा निर्णय.

-सोशल डिस्टनसिंग साठी घेण्यात आला निर्णय

नवी मुंबई:एपीएमसी प्रशासनाकडून रोज नवनवीन उपयोजना करून सुद्धा एपीएमसी बाजारात गर्दीमूळे सोशल डिस्टन्स ठेवणे कठीण झाले आहे म्हणून एपीएमसी प्रशासनाने बाजारातील गर्दी कमी करण्यासाठी बाजार विस्तार करण्यासाठी ठरवले आहे,त्यासाठी आज एपीएमसी प्रशासन आणि कोंकण विभागीय आयुक्त यांनी संयुक्त रित्याने अनेक कठोर निर्णय घेण्यात आले. राज्य शासनाच्या आदेशावरुन घेण्यात आलेले या निर्णयात जर काही थोक बाजारात होणारी गर्दी नियंत्रणात नाही आली बाजार समिति तर्फे भाजीपला व फळ मार्केट वाशी येथून खारघर येथे पुढच्या दोन चार दिवसात पूर्णपणे शिफ्ट करण्यात येईल. कोंकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, बाजार समिति सचिव अनिल चव्हाण आणि इतर अधिकाऱ्यां बरोबर झालेली बैठकीत खालील निर्णय घेण्यात आली .

गर्दीमुळे होणारा संभाव्य धोका लक्ष्यात घेता हे पाऊल उचलण्यात येत आहे.जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा शहरातील नागरिकांना अविरत सुरू राहावा, हीच यामागचा भूमिका आहे.

# भाजीपाळा मंडी लगत एसटी महामंडल यांचे 4 एकड़ मोकळ्या जागेवर 200 भाजीपाळा व्यापाऱ्यांना सिफ्ट करण्यात येईल. या मुळे मूळ बाजारात गर्दी कमी होण्यात मद्त मिळणार.

# भाजीपला व फळे बाजाराच्या बाहेर प्रवेशद्वाराजवळ 500 मीटर पर्यंत 10 लेनची मोठी बैरिकेटिंग करण्यात आली आहे या बैरिकेटिंगच्या माध्यमातून सोशल डिस्टेंसिन्ग प्रणालीचा वापर करून व्यापारी,कामगारला आत सोडण्यात येणार आहे.

# उद्या सोमवारी पासून भाजीपाला आणि फळे बाजाराच्या आवारात किरकोळ खरेदीदाराना प्रवेश बंद करण्यात आली आहे. आता फक्त होलसेलर यांनाच आत सोणण्यात येणार. त्याच बरोबर आतमध्ये प्रत्येक गाळा बाहेर एक मीटरची सोशल डिस्टेंसिन्गच्या कठोर रित्याने पालन करण्यात येईल.

# बाजार समितीत असलेले सर्व घाऊक व्यापारी आणि इतर घटक जर हे नियम तोडले तर भाजीपाळा आणि फळ बाजाराचे जवळ जवळ 2000 व्यापार्यांना खारघर येथे सेंट्रल पार्कच्या जवळ 50 ते 60 एकड़ भूखंडावर दोन ते चार दिवसात पाठवन्यात येणार.

 

Share: