Big Breaking: मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली, कोरोनाच्या संकटात Apmc मधील 22 अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्तीचा प्रस्ताव मंजूर !

45
0
Share:
-कोरोनाच्या संकटात एपीएमसी अधिकाऱ्यांची स्वेच्छा निवृत्तीच्या प्रस्ताव मंजूर.
-अधिकाऱ्याच्या स्वेच्छा निवृत्तीमुळे एपीएमसीच्या आर्थिक परिस्थिती परिणाम होणार.
नवी मुंबई – अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी व  कर्मचारी यांनी काम सोडून जाऊ नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केले होते. त्यानंतरही एपीएमसी प्रशासनाने 22 अधिकारी व कर्मचाऱ्याच्या  स्वेच्छा निवृत्तीचे ठराव मंजूर करून मुख्यमंत्र्यांच्याच आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.अधिकाऱ्यांच्या स्वेच्छा निवृत्तीमुळे एपीएमसीच्या आर्थिक परिस्थिती परिणाम होणार है. शिवाय अत्यावस्यक सेवा मध्ये काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची यांचीही कमतरता भासणार आहे.
 राज्यासह देशावर कोरोनाचे संकट कोसळले आहे. या परिथिती मध्ये आपत्कालीन यंत्रणा दिवस रात्र झटत आहे. त्यात शासकीय, निमशासकीय अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. अशात काही अधिकारी स्वेच्छानिवृत्ती घेऊन जबाबदारीतून पळ काढू पाहत असल्याचे एपीएमसी मध्ये दिसून येत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकडाऊननंतर अन्य कोणत्याही कामांना प्राधान्य न देता सर्वत्र कोरोनवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मुंबई ,ठाणे व नवी मुंबईत अत्यावश्यक सेवा पुरवठा करणाऱ्या एपीएमसी कर्मचाऱ्यांना विविध जबाबदाऱ्या दिल्या असताना कोरोनाचा भीतीमुळे जवळपास 22 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दिला होता यामध्ये काही जण मागे घेतले तर काही जण नवीन आले . यामध्ये   सुरक्षा विभाग, अभियंता , प्रशासन,भाजीपला मार्केट,फळ मार्केट भागातील काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्या  समावेश आहेत.
देशात कोरोनाचे रुग्ण सापडल्यापासून केंद्र आणि राज्य सरकारने आपत्कालीन परिस्थिती घोषित केली आहे.13 मार्च पासून साथरोग कायद्यही लागू झाला आहे.एपीएमसी मध्ये विविध कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या संदर्भात जबाबदारी दिली आहे .शासनाने एपीएमसी मार्केट सुरू करण्यासाठी विविध प्रकारच्या उपायोजना करत आहेत सध्या एपीएमसी संबधीत रुग्णची संख्या 590 वर पोहचले असून 10 जणांना मृत्यू झाली आहे जसे जसे कोरोनाचे कहर सुरू झाली तसे तसे  एपीएमसी मधील अधिकारी व कर्मचारी यांनी स्वेच्छानिवृत्ती  साठी अर्ज देण्यात आली आहे. एपीएमसी मध्ये पाच मार्केट मधील येणाऱ्या गाड्याला सॅनिटायझर करणे, कर्मचाऱ्यांना वैद्यकीय देखभाल करणे,आवक जावक वर नजर ठेवणे या साठी रात्र दिवस काही अधिकारी व कर्मचारी  काम पाहत आहेत. मात्र काही अधिकारी व  कर्मचारी त्यांच्या  स्वतःच्या फायदासाठी स्वेच्छानिबृत्तीसाठी अर्ज दिले आहेत. त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाचा महामारी मध्ये काम करायचं नाही असे दिसून येत आहे. सध्या या अधिकाऱ्याच्या  डोळे एपीएमसीच्या तिजोरीवर असल्याचेही बोलले जात आहे.
एपीएमसीच्या तिजोरीतुन कोट्यवधी रुपये खाली होऊन आर्थिक परिस्थिती कोलमोडणार असे दिसून येत आहे. वास्तविक पाहता भारतामध्ये आर्थिक परिस्थिती गंभीर होऊन  लाखो लोकांच्या रोजगार जातील त्यामुळे केंद्र सरकारने DA दीड वर्षासाठी स्थगित दिली आहे. त्याचबरोबर  महाराष्ट्र शासनाने आपल्या कर्मचाऱ्यांना 50 टक्के पगार दिला  आहे, अशी परिस्थिती असतानाही एपीएमसीच्या प्रशासनाने 26 मे रोजी प्रस्ताव मंजूर केली आहे. पूर्ण भारतात आणीबाणीची परिस्थिती असल्याने स्वेच्छानिवृत्ती बंद असताना केवळ एपीएमसी मध्ये सुरू आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवसरात्र कांम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये  नाराजी व्यक्त केली जात आहेत.
विशेष म्हणजे निवृत्तीसाठी जे अधिकारी व कर्मचारी यांनी अर्ज दिले आहेत. त्यापैकी काही अधिकारी व कर्मचाऱ्यांवर विविध प्रकारच्या तक्रार आहेत या चौकशीच्या फेऱ्यातून वाचण्यासाठी त्यांनी निवृत्ती घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केले आहेत अशी माहिती आरटीआय करकर्ते अनर्जीत चव्हाण यांनी दिली आहे.परंतु त्यांना स्वेच्छानिवृत्ती मिळाल्यास मागील काही महिन्यात एपीएमसी मध्ये घडलेले अनेक घोटाळे दडपले जातील याचीही शक्यता नाकारता येत नाही.
यासंदर्भात एपीएमसीच्या प्रशासक व  सचिव अनिल चव्हाण यांनी सांगितले की ह्या  निर्णय प्रशासनाने घेतली आहे .
-अनिल चव्हाण- प्रशासक व सचिव एपीएमसी
Share: