सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे खाते जयंत पाटील संभाळणार .

5
0
Share:

*कोरोनाची लागण झाल्याने जयंत पाटील संभाळणार बाळासाहेब पाटील यांचे खाते

मुंबई: राज्याचे सहकार व पणन मंत्री तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्या खात्याचा तात्पुरता कार्यभार जयंत पाटील यांना देण्यात आला आहे.सध्या बाळासाहेब पाटील वैदकीय कारणामुळे अनुपस्थित आहे
महाराष्ट्र शासन कार्यनियमावली मधील नियम 6-अ नुसार बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्या खात्याचा तात्पुरता कार्यभार जयंत पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला.वैद्यकीय कारणास्तव अनुउपस्थितीच्या कालावधीत तात्पुरती व्यवस्था म्हणून बाळासाहेब पाटील यांच्याकडील “सहकार पणन,” या खात्याचा कारभार जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांच्यावर सोपवण्यात आला आहे.सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर कायदे व नियम या शीर्षतेखाली उपलब्ध करण्यात आली आहे.

Share: