शेळी आणि मत्स्यपालनासाठी ५० टक्के अनुदान देण्याचा विचार: जानकर

23
0
Share:

महिलांनी एकत्रित येऊन उत्पादने घ्यावीत, त्याला मोठया उद्योगाशी करार करून देत त्याला बाजारपेठ उपल्बध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे यासाठी सरकार अनुदानासंदर्भात विचार करत आहे. शेळीपालन आणि मत्स्यपालन करणाऱ्या बचत गटांना ५० टक्के अनुदान देण्याचा विचार सरकार करत आहे असे पशुसंवर्धन व मत्स्य विकासमंत्री महादेव जानकर यांनी सांगितले.
पुणे विभागीय व जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शन ‘दख्खन माणिजी जत्रे’ च्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात जानकर बोलत होते.
जानकर म्हणाले “कराडमधील बचत गटांनी सेंद्रिय आणि नैसर्गिक गूळ, महाबळेश्वर मधील बचत गटांनी मध, दुष्काळी भागातील बचत गटांनी मांस विक्रीचा एकत्रितपणे व्यवसाय करावा”. त्यासाठी सरकार परदेशात निर्यात करण्यासाठी करार करेल असे महादेव जानकर यानी आपल्या भाषणात सांगितलं.

Share: