मुंबई Apmc कांदा-बटाटा मार्केटमध्ये व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची फसवणूक; ग्राहकांनी फिरवली पाठ

21
0
Share:

नवी मुंबई: मुंबई एपीएमसी कांदा-बटाटा घाऊक बाजारात सध्या ग्राहक नसल्याने उठाव नाही. ग्राहक नसल्याने माल शिल्लक राहून तो खराब होतो. व त्यानंतर नाईलाजाने तो माल हा व्यापाऱ्यांना फेकावा लागतो. पण “खरंच खराब झालेला माल हे व्यापारी फेकतात का”? “फेकतात की एखाद्या गरीबाची फसवणूक करून त्याच्या माथी मारतात”? “मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये ग्राहकांची संख्या कमी होण्यामागचे नेमके कारण काय”? व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची नेहमीच फसवणूक करणयात येते. अशीच एक घटना मुंबई एपीएमसी कांदा-बटाटा मार्केटमध्ये घडली आहे.

कोरोना काळात नोकऱ्यांसह अनेकांचे व्यापार देखील ठप्प झाले आहेत. अनेकांनी कसाबसा उदरनिर्वाह करून त्यांचा व त्यांच्या कुटुंबाच पोट भरलं, परंतु काही लोकांनी या संकटाच्या काळातही आपली लालची वृत्ती बाजूला ठेवली नाही. कोपरखैरणे येथे राहत असलेले प्रकाश महादेव शिंदे हे एक सामान्य माथाडी कामगार आहेत. शिंदे यांच कुटुंब मोठं असून त्यांच्या कुटुंबात एकूण २५ सदस्य आहेत. घरगुती वापरासाठी प्रकाश शिंदे यांनी मुंबई एपीएमसी कांदा-बटाटा मार्केटमधून “यशराज ट्रेडर्स दुकान नं २१५” या व्यापाऱ्याकडून  ४००० हजार २८० रुपयांची बटाट्यांची खरेदी केली होती. मात्र शिंदे यांना खरेदी दरम्यान दाखवण्यात आलेला बटाटा हा चांगल्या दर्जाचा दाखवला असून मूळ गोणी ही नासलेल्या बटाट्यांची दिली गेली.

हा प्रकार शिंदे यांच्या लक्षात आल्यानंतर व्यापाऱ्याला फोन केले असता फोन उचलण्यात येत नसल्याने तो माल बदलवून घेण्यासाठी ते व्यापाऱ्याकडे गेले त्यावेळी व्यापाऱ्यांकडून त्यांना उद्धटपणे उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची केली जाणारी फसवणूक कधी थांबणार व त्यांना योग्यवेळी योग्य तो न्याय कधी मिळणार असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्यावतीने प्रकाश शिंदे यांनी केला आहे. तसेच यासंदर्भात जनतेची अशा प्रकारे फसवणूक केल्या जाणाऱ्या व्यापाऱ्यांवर बाजारसमिती काय निर्णय घेणार हे नकीच महत्वाचं ठरणार आहे.

Share: