होळीच्या बाजारपेठेलाही करोनाबाधा,विक्रीत 50 टक्क्यांनी घट

17
0
Share:
वाशी बाजारात भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्या.
नवी मुंबई:होळी म्हणजे भारतीयांचा सर्वात आवडत सण ,लहानपणांपासून मोठ्यांपर्यंत हा सण अगदी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.पण सध्या चर्चेत असणार्या कोरोना व्हायरसमुळे ,बाजारात विकल्या जाणाऱ्या चायना रंगांबाबत प्रश्र्न निर्माण झालेला आहे. तरी काही ठिकाणी चायना मालाची विक्री काही प्रमाणात  बंद झालेली असून , व्यापारी वर्गाने  भारतातील नैसर्गिक रंग विक्रीसाठी ठेवले आहेत.
आणि ग्राहक वर्गाकडून सुद्धा भारतीय रंगाची मागणी केली जात आहे.तरी ही या व्हायरसच्या भीतीमुळे बाजारात, दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी कमी ग्राहकी पाहायला मिळतं आहे.चायनाच्या कोरोना व्हायरमुळे भारतातील नागरीकांना एका भीतीच्या दडपणाखाली जगावं लागत आहे.आणि आर्थिक नुकसान सहन करावं लागतं आहे.
चीनमधील ‘करोना विषाणू’च्या हाहाकारामुळे यंदा धुळवडीला चीन बनावटीच्या पिचकाऱ्या बाजारात हद्दपार झाल्या आहेत. होळीनिमित्त खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत असली तरी चिनी बनावटीच्या पिचकाऱ्यांना दूर ठेवण्यात आले आहे. वाशी एपीएमसी बाजारात दरवर्षी चिनी पिचकाऱ्यांचा प्रभाव असतो. यंदा भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्यांवर भर देण्यात आला आहे.भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्या मोठय़ा प्रमाणावर बाजारात दाखल झाल्या आहेत. लहान मुलांमध्ये कार्टूनच्या पिचकारीला अधिक मागणी आहे पण ग्राहक नसल्याने बाजारात शुकशुकाट पसरले आहेत.
 करोनामुळे बाजारपेठेत भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्या आल्या आहेत. 50 ते 300 रुपयांपर्यंत पिचकाऱ्या आहेत. नैसर्गिक रंगांची किंमत 30 ते 150 रुपयांपर्यंत आहे. कार्टूनच्या आकारातील पिचकाऱ्या आकर्षकतेमुळे लहान मुलांच्या पसंतीला उतरतात. गेल्या वर्षी बाजारात चिनी वस्तू दाखल झाल्या होत्या. त्यापैकी 20 टक्के वस्तूच बाजारात शिल्लक आहेत. सध्या शिलकीत असलेल्या पिचकाऱ्यांची विक्री केली जात असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.
विक्रीत 50 टक्क्यांनी घट
करोनाचा प्रसार होण्याच्या भीतीने एकत्रित होळी न खेळण्याचे आवाहन समाजमाध्यमावरून केले जात आहे. याला प्रतिसाद देत अनेक गृहसंस्थांनी होळीचे कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यामुळे  बाजारपेठेला मंदीची आणखीन झळ सहन करावी लागणार आहे.चीनमध्ये करोना विषाणूने कहर माजविल्याने तेथून होणाऱ्या आयातीवर र्निबध आले आहेत. चीनमधून होळीच्या रंगाची उधळण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पिचकाऱ्या, रंग यांचा पुरवठा जानेवारीपासून खंडित झाला आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी जानेवारीआधी साठा करून ठेवलेल्या वस्तूंवरच सध्या होळीच्या बाजारपेठेची मदार आहे. या जोडीला भारतात तयार झालेल्या महागडय़ा वस्तूंची विक्री करण्यावर भर आहे. एकीकडे बाजारातील मंदीमुळे आधीच विक्री सुमारे ५० टक्क्य़ांनी घटलेली आहे. करोनामुळे त्यात आणखी भर पडण्याची धास्ती व्यावसायिकांना लागून राहिली आहे. नवीन माल नसल्याने ग्राहकांकडे खरेदीचे पर्यायही कमी आहेत.
Share: