Corona Breaking:नवी मुंबईत कोरोनाचा धोका वाढला,24 तासांत आढळले 6 रुग्ण

4
0
Share:
कोरोना पोजिटीव्ही रुग्ण मध्ये 3 पोलीस कर्मचारी,1डॉक्टर, 1 एमबुलन्स ड्रायव्हर
नवी मुंबई:कोरोना व्हायरसनं आता मुंबईसह उपनगरांमध्येही थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. रविवारी नवी मुंबईत दिवसभरात 6 नवीन कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण आहे. आतापर्यंत नवी मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या 66वर पोहोचली आहे. घणसोलीमध्ये 2, नेरूळमध्ये 1, दिघामध्ये 2,सानपाडा 1 रुग्ण आढळले आहेत. हे सर्वजण कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या लोकांच्या संपर्कात आल्यानं त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे.
यामध्ये ठाणे येथील एका पोलीस कर्मचारी जे घणसोली येथे राहतात त्याचा संपर्कात आलेल्या  2 पोलीस कर्मचारी आहेत त्याच बरोवर घणसोली येथील राहणाऱ्या एक डॉक्टर जे राजावाडी हस्पिटल मध्ये डॉक्टर आहेत, नेरुळ मध्ये राहणाऱ्या मुंबई मध्ये 108 एमबुलन्स मध्ये वाहन चालक म्हणन काम करत आहेत त्याचा रिपोर्ट पजिटीव्ही आल्याने सगळे जागेवर फवारणी करण्यात आली आहे ,तसेच सानपाडा येथील एका 68 वर्षीय महिलाची पाय फ्रँकचर झाल्याने एक महिन्या पासून जे विविध रुग्णालयात जाऊन उपचार केल्याने प्रवासात कोरोनाचे लागण झाले आहेत ।
Share: