Corona Breaking: शेतकरी,ग्राहकांची व्यापाऱ्यांकडून लुबाडणूक

24
0
Share:

-करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा उठविण्यास व्यापाऱ्यांनी सुरुवात केली आहे.

-लॉक डाऊनचा फायदा सर्वात जास्त धान्य मार्केटचा व्यापारी घेत आहे त्यामुळे शेतकरी व ग्राहक कंगाल ,व्यापारी मालामाल.

-एकीकडे मोठा प्रमाणात माल मागवले जातात दुसरीकडे भाव वाढबून विक्री केला जातात.

-धान्य मार्केटमध्ये दोन दिवसात 1350 गाड्याची विक्रमी आवक.

– सर्व डाळींचे भाव गगनाला भिडले आहेत. तूरडाळ ,मूग व चना डाळीचे भाव शंभरी पार

 

नवी मुंबई:करोनाच्या साथीमुळे देशभरात निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीचा फायदा उठवत एकाचवेळी शेतकरी आणि ग्राहकांची फसवणूक करण्याचा नवा उद्योग काही व्यापाऱ्यांनी सुरू केला आहे.

मुंबई एपीएमसी मसाला मार्केट मध्ये एका व्यापाऱ्याला कोरोनाचे लागण झाल्याने बाजारात खळवळ उडाली होती त्यामुळे इथे काम करणाऱ्या माथाडी कामगार ,ग्राहक व व्यापाऱ्या मध्ये भित्तीचे वातावरण निर्माण झाले मात्र दुसरी कडे काही व्यापारी करोनाचा फायदा घेऊन बाजारात मोठ्या प्रमाणात धान्य,डाळी मागविण्यात दिसून येत आहे. धान्य मार्केटमध्ये दोन दिवसात 1350 गाड्याची आवक झाल्याने धान्य खरेदी विक्री साठी गर्दी पाहायला मिलत आहे .बाजारात काम करणाऱ्या माथाडी कामगार सांगितले प्रमाणे बाजारात एवढे प्रमाणात आवक यापूर्वी कधी नव्हता .बाजार आवारात सोशल डिस्टनसिंगची तीन तेरा होत आहे . कोणत्याही प्राथमिक काळजी न घेता व्यापारी व्यवहार करताना दिसून आले आहे त्यामुळे काही व्यापारी मध्ये भित्तीचा वातावरण निर्माण झाले आहे.एपीएमसी प्रशासनाने 11 एप्रिलपासून कांदा बटाटा, भाजीपला व फळे बाजार पुढची आदेश येईपर्यंत बंद करण्यात निर्णय घेतला आहे.

राज्यात दिवसेंदिवस करोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. सध्या अत्यावश्यक गोष्टी सोडून इतर वस्तूचे दुकान बंद आहेत. कोकण आयुक्त शिबाजीराव दौड याचा मध्यस्थीत बाजार सुरू करण्यात आली परंतु बाजार आवारात येणाऱ्या ग्राहकांची मोठी गर्दी पाहून बाजार आवारात व्यापार करणाऱ्या काही व्यपाराला भित्ती वाटत आहेत सध्या नवी मुंबईत कोरोनाचे 31 रुग्ण आढळून आले आहेत त्यासाठी महानगरपालिका आणि एपीएमसी प्रशासन जोरात कामाला लागले आहेत तर धान्य बाजारात व्यापाऱ्या कडून जास्त धान्य मागवल्याने पूर्ण परिसरात गर्दी दिसून येत आहे.

गाड्याची गर्दी इतकी आहे की पूर्ण बाजार आवरा भोवती गाड्या उभ्या असल्याचे दिसून येत आहे,ग्राहकांची गाड्या आत घेतल्याने हळूहळू गाड्या आत सोडला जात आहे.त्यामुळे रस्त्यावर लांबच लांब गर्दी दिसून येत आहे.
मुंबई एपीएमसी दाना मार्केटमध्ये 70 रुपये दराने विकला जाणाऱ्या तूरडाळ,चना डाळ आता 90 ते 105 रुपये दराने विकला जात आहे ,90 रुपये दराने बिकला जाणाऱ्या मुगडाळ 125 रुपये दराने विकली जात असून व्यपार्यांकडून होणार ही लूटमार थांबविण्यासाठी सरकारने वेळीच हस्तक्षेप करावा,अशी मागणी ग्राहकाकडून होत आहे.
कोरोनामुळे राज्यातील सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत.टाळेबंदीचा लोकांना अधिक त्रास होऊ नये यासाठी जीवनावश्यक वस्तू भाजीपाला ,कडधान्य यांची दुकाने तसेच वाहतुकीस सरकारने परवानगी दिली आहे.व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक दूर करण्यासाठी सरकारने काही वर्षांपूर्वी फळे-भाजीपाला नियमनमुक्त करण्याच्या निर्णय घेतला होता.मात्र आता याचाच फायदा उठवत शेतकऱ्यांची अडवणूक आणि ग्राहकांची लुबाडणूक करण्यास व्यापाऱ्यांनी सुरुवात केली आहे.याचा सर्वाधिक फटका भाजीपाला व फळ उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा उठविण्यास व्यापाऱ्यांनी सुरुवात केली आहे.ठाकरे सरकार कडून याकडे लक्ष दिले पाहीचे अशी प्रतिक्रिया काही ग्राहकांनी दिली आहे.

Share: