Corona Breaking-अखेर मुबई लॉक डाऊन,लोकल आजपासून 31 मार्चपर्यंत पूर्ण बंद;देशातील रेल्वे वाहतुकही थांबली..

24
0
Share:

नई दिल्ली:कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी 22 मार्च रविवारी मध्यरात्रीपासून 31 मार्चपर्यंत मुंबई लोकलसेवेसह देशभरातील सर्व रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. येत्या 31 मार्चपर्यंत लोकल तसेच, भारतीय रेल्वेच्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणूचा वाढता धोका पाहता भारतीय रेल्वेने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.येत्या 31 मार्च पर्यंत फक्त मालवाहतूक करणाऱ्या (All Trains And Local Canceled) गाड्या सुरु राहातील, इथर सर्व प्रवासी गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने दिला आहे.

रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व लांब पल्ल्याच्या पॅसेंजर, मेल, एक्सप्रेस गाड्या या 31 मार्चपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. फक्त मालगाड्या सुरु राहणार आहे. तसेच, आज रात्री 12 पासून मुंबई लोकलही बंद ठेवल्या जाणार आहे. त्यामुळे अखेर मुंबईची (All Trains And Local Canceled) लाईफलाईनही ठप्प पडणार आहे.

रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय

कोरोना विषाणूंचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाकडून सर्व लोकल ट्रेन, प्रिमिअम ट्रेन्स, मेल, एक्सप्रेस गाड्या, पॅसेंजर ट्रेन, कोकण रेल्वे, कोलकाता मेट्रो ट्रेन आज मध्यरात्री पासून बंद ठेवल्या जाणार आहेत.

दरम्यान, ज्या ट्रेन किंवा एक्सप्रेस या संध्याकाळी 4 पूर्वी निघाल्या असतील त्या ट्रेन सुरु राहणार आहेत. तर देशात इतर ठिकाणी गरजेच्या वस्तू ने-आण करण्यासाठी मालगाड्या मात्र सुरु ठेवण्यात येणार आहेत. तसेच, ज्या प्रवाशांनी तिकिटाचे बुकिंग केले असेल त्यांना पूर्ण पैसे रिफंड करण्यात येतील.

 

Share: