करोनामुळे नागपूर संत्र्याला जगभरातून मागणी,100 टन संत्री दुबईला रवाना

17
0
Share:
नवी मुंबई:करोनाचे थैमान सर्व क्षेत्राला घायकुतीस आणणारे ठरल्याचे चित्र एकीकडे असतानाच संत्रा उत्पादकांची मात्र करोनामुळे ‘दिवाळी’ झाली आहे. देशांतर्गत आणि आखाती देशात चढय़ा भावाने संत्र्याचा पुरवठा होत असून व्हिटॅमिन ‘सी’युक्त फळे खाण्याचा वैद्यकीय सल्ला संत्रा उत्पादकांना सुगीचे दिवस दाखवत आहे.
सध्या मुंबई एपीएमसी निर्यात भवन मधून आखाती देशात मोठ्या प्रमाणात पाठवण्यात येत आहेत.  संत्राची मंगणी जास्त असल्याने निर्यातदार संत्री पाठवण्याकडे लक्षय देत आहेत.विमान प्रवास बंद झाल्याने समुद्रिमार्गे संत्री पाठवण्यात येत आहेत समुद्रिमार्गे पाठवण्यासाठी 3 ते 4 दिवस लागत असल्याने संत्रावर निर्यात भवनमध्ये योग्य प्रक्रिया केली जाते त्यामध्ये निर्जंतुकीकरण, वाशिंग,नाचूरल वास्कोतीं  इत्यादी प्रक्रिया करून योग्य  तापमानात  बंद करून समुद्रिमार्गे पाठबळे जाते ,गेल्या दोन आठवड्यापासून पाच कंटेनर मध्ये 100 टन नागपूर संत्री पाठवण्यात आले आहे सध्या 800 टन संत्र्याची मागणी आखाती देशातून होत आहे मात्र  किरणांचा प्रकरणामुळे योग्य साधन नसल्याने संत्री पाठवण्यात अडथले निर्माण होत आहे.ज्या प्रमाणे परिस्थिती सुधारणा होईल त्याच बरोबर संत्राची टार्गेट पूर्ण करण्यात येईल अशी माहिती पणन निर्यात अधिकारी यांनी दिली आहे।    कृषीमालाची देशाबाहेर बाजारपेठ वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी असणाऱ्या पणन अधिकारी प्रयत्न आहेत.
कारण काय? :  संत्र्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, आरोग्य सुधारण्यास मदत होते, असा डॉक्टरांचा सल्ला संत्र्याची मागणी वाढण्यामागचे कारण ठरत आहे. संत्र्यातील पोषणमूल्य आजारातून लवकर बरे होण्यास उपयुक्त  ठरतात. त्यामुळे सध्या २० हजार रुपये टनाने विकली जाणारी नागपुरी संत्री लवकरच ३५ हजार रुपये टनापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
नागपुरी संत्री प्रथमच दुबईत गेली. त्यांची चव पाहून मागणी वाढल्याने ‘नागपुरी संत्री’ असे लेबल लावून ती विकण्याची मागणी लगेच मान्य झाली आहे.
Share: