हापूस आंबावर ‘कोरोना’चा फटका!

27
0
Share:

-हापूस आंबावर ‘कोरोना’चा फटका!

कोरोना वायरस च्या प्रभावाने  बाजारात  आलेेलंया आंंब्याला  उठाव नाही.

40 टक्के हापूस आंबा परदेशात जातात कोरोना मुळे निर्यात बंद झाली

नवी मुंबई:वाशी एपीएमसीतील फळ बाजारात फळांच्या राजा हापूस आंबा दाखल झाला आहे.वातावरणाचा फटका बसल्याने या वर्षी हापूस आंब्याची बाजारातील आवक नेहमी च्या मानाने केवळ १५ ते २० टक्केच आहे. हापूस चा मुख्य हंगाम सुरु व्हायला एप्रिल महिन्यांचिच वाट पाहावी लागणार आहे. आवक कमी असल्यामुळे सध्या बाजारात येत असलेल्या आंब्याला मोठा दर आहे. घाऊक बाजारातच हा हापूस आंबा 2000 ते 2500 रु डझन पासून आहे. इतका महाग आंबा निर्यात हि होत नाही आणि करायला गेले तर कोरोना वायरस च्या प्रभावाने तो निर्यात करताही येत नाहीय .त्यामुळे बाजारात येत असलेल्या या आंब्याला आता उठाव मिळत नसल्याची परिस्थिती आहे. परिणामी आंबा विक्रेत्यांची चिंता वाढली आहे
रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगडच्या हापूस बागायतदार त्यांच्या निर्यातीसाठी सज्ज असतानाच चीनमध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. संपूर्ण आशिया खंडात कोरोनाने हाहाकार उडाला असताना त्याचा मोठा परिणाम हापूस आंब्याच्या निर्यातदाराना पडला आहे .हापूस आंबाच्या सगळे जास्त मागण्या गोल्फ देशात आहे ,हापूस आंबाच्या शंभर टक्के प्रॉडक्शन मध्ये 40 टक्के आम दुबई मध्ये जातात आणि उर्वरीत 60 टक्के लोकल मार्केट मध्ये बिकला जात आहे.दरवर्षी पाडव्याला एक लाख पेट्या हापूस आंब्याची आवक होण्याचाच मान या मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या घाऊक फळ बाजाराचा आहे. त्या अगोदर पाडव्याच्या पंधरा दिवस आगोदर किमान ५० हजार पेट्या आंब्याची आवक बाजारात होते . मात्र यावेळी हा हंगामात पाच हजार पेट्यांची आवक हि बाजारात होऊ शकली नाहीय. कारण बाजारात पाठवण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांकडे झाडांवर इतके आंबेच नाहीत. झाडांना आत्ता फळ धारणा झाली आहे हे आंबे पंधरा एप्रिल पासून बाजारात येतील तेव्हा पासून आंब्याची आवक वाढायला सुरुवात होईल .
सध्या घाऊक बाजारात कोकणातून 3 ते 4 हजार पेट्यांची आवक होत आहे ,महाराष्टबाहेरून कर्नाटक केरळ बंगलोर या परिसरातून तोतापुरी बदामी जातीचे आंबे बाजारात हापूस पेक्षा अधिक येत आहेत. आज घाऊक फळ बाजारात कोकणातून 3635 पेट्यांची आवक झाली आहे तर इतर भागातून इतर जातीचाय आंब्याची साडे आठ हजार पेट्यांची आवक झाली आहे. अशी माहिती बाजार समितीचे उप सचिव ईश्वर मसराम यांनी दिली आहे . फेब्रुवारीच्या महिन्यात साधारणपणे 5 ते 6 टन आंब्याच्या पॅकिंग असतात आता कोरोना मुळे पूर्णपणे ठप्प झाली आहे.मुंबई एपीएमसी मध्ये साधारणपणे 70 ते 80 निर्यातदार आहेत .दिवसात एअर कार्गो मधून परदेशात भाजीपाला ,फळ पाठवण्यात येत आहे.मोहन डोंगरे नामक एका निर्यातदार 1981 पासून मुंबई एपीएमसी फळ बाजारात हापूस आंबाच्या निर्यात करतो त्यांनी सांगितले प्रमाणे माझा जीवनात एवढ्या फटका कधी बसला नव्हता आता कोरोना व्हायरस मूळे बसला. परंतु दुबईसारखी विशाल बाजारपेठ हातची गेल्याने निर्यातक्षम हापूस आंबाचे दरही घसरले आहेत. त्यातच निर्यात होणारी ही आंबे स्थानिक बाजारपेठेतही विकली जात नाहीत. आवक वाढत असल्याने व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केला आहे. मात्र हा महाग आंबा घेण्यासाठी आधीच कुणी सहसा समोर येत नाही त्यातच थोड्या फार प्रमाणात निर्यात करायचा विचार केला तर महाग आंबा निर्यात करणे व्यापाऱ्यांना परवडत नाही. त्यामुले जो काही आंबा घाऊक बाजारात येत आहे त्याला उठाव नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे व्यापार्यां कंदील आंबा पडून असल्याचे चित्र बाजारात आहे. यामुले आंबा व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे. निर्यातीसाठी आंबा पाठवायचा झाला तर आंबा पाठवण्यात अडचणी येत आहेत. कोरोना वायरस मुले कार्गो फ्लाईट मिळत नसल्याची परिस्थीती आहे. त्यामुळे आंबा पाठवणं शक्य होत नसल्याची खंत आंबा निर्यातदार मोहन डोंगरे यांनी व्यक्त केली आहे.

Share: