Corona :नवी मुंबईत 10 जणांपर्यंत कसा पोहोचला कोरोना?

25
0
Share:

*नवी मुंबईत 10 जणांपर्यंत कसा पोहोचला कोरोना?*

*कोरोनाची साखळी असते तरी कशी ?*

*कोरोना कसा फैलावत जातो ?*

नवी मुंबई : स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या (How Corona Entered In Navi Mumbai) नवी मुंबई शहरात कोरोनाचे विषाणू कसे आले? जगभरात कोरोनाचा कहर सुरु असताना पालिका प्रशासनातर्फे त्यासाठी विशेष काळजी घेत असताना कोरोना नवी मुंबई शहरात 10 जणांपर्यंत कसा पसरतो? या प्रश्नांची उत्तरं मिळवताना कोरोना टाळण्यासाठी काय करायला हवं याचीही उत्तरं मिळत जातात. लॉकडाऊनमध्ये घरीच बसून ही साखळी तोडण्यास कशी मदत होईल हे जाणून घ्यायचं असेल तर नवी मुंबईत पोहोचलेल्या कोरोनाचा प्रवास सगळ्यांनी वाचायलाच हवा.

फिलिपिन्सचे काही नागरिक वाशी येथील नूर माशीदला 3 मार्चला भेट देतात. या सर्वांच्या राहण्याची व्यवस्था मशीदीतर्फे करण्यात येते. त्यापैकी काही जण 5 मार्चला दिल्लीला जातात. त्यानंतर दिल्लीला गेलेले फिलिपिन्सचे नागरिक 10 मार्चला परत नूर मशीदमध्ये येतात. फिलिपिन्सवरुन आलेल्या या 10 जणांच्या गटातील एका 59 वर्षीय व्यक्तीला श्वसनाचा त्रास होत होतो. त्यानंतर त्याला डॉक्टरांकडे नेण्यात येतं आणि डॉक्टर तपासणीनंतर त्याला कस्तुरबा रुग्णालयात पाठवतो. कस्तुरबा रुग्णालयात या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर येतं आणि अशाप्रकारे हा कोरोना विषाणू नवी मुंबईत प्रवेश घेतो.

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 237 वर, मुंबई शंभरीच्या उंबरठ्यावर, धाकधूक वाढली
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 237 वर पोहोचला (Rise in Maharashtra Corona Patients) आहे. मुंबईत 5, पुणे आणि अहमदनगरमध्ये प्रत्येकी 3 नवे रुग्ण आढळले आहे.
त्यानंतर वाशी आणि दिल्लीत या गटाने वास्तव्य केलेल्या मशिदी 14 दिवसांसाठी बंद करण्यात आल्या. तसेच, या गटातील इतरांनाही कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आलं. त्यातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं.
त्याच दरम्यान, फिलिपीन्सच्या नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तसेच, त्याच्या 3 साथीदारांनाही कोरोनाची लागण झाली. या चार कोरनाबाधित फिलिपिन्स नागरिकांच्या संपर्कात आलेल्या मशीदीचे मौलवींचाही आरोग्य तपासणी अहवाल कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आला. यामध्ये मौलवींनाही (How Corona Entered In Navi Mumbai) कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं.
महानगर पालिकाचे आरोग्य अधिकारी मौलवींना उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात घेऊन जाण्आसाठी आले, त्यावेळीसोबत असलेल्या डॉक्टरांना शिवीगाळ करण्यात आला होता. परंतू डॉक्टरांनी पोलिसांच्या साहाय्याने मौलवीला कस्तुरबा रुग्णालयात दाखल केलं. त्याचबरोबर मौलवीच्या कुटुंबातील तिघांचीही तपासणी करण्यात आली आणि हे तिघेही कोरोना पॉझिटिव्ह निघाले.
हे सगळे फिलिपिन्स नागरिकांच्या संपर्कात आले होते. ते जसे लोकांना भेटले तसा कोरोनाही पसरला. मंगळवारी दोघांचे आरोग्य अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आता नवी मुंबईत एकूण 10 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत. त्यामध्ये मौलवीची गाडी ठीक करणाऱ्या एका गॅरेज चालकाचाही समावेश आहे. हे गॅरेज चेंबूरमध्ये आहे.
यासंबंधी नवी मुंबई महानगरपालिका तर्फे बीएमसीला एक पत्र देण्यात आले आहे. त्यामध्ये कोरोनाची साखळी कशी असते, याचं हे प्रातिनिधिक उदाहरण देण्यात आलं आहे.

फिलिपिन्सच्या कोरोनाबाधित रुग्णाचा धक्कादायक प्रवास

3 मार्च – फिलिपिन्समधून या बाधितासह एकूण 10 जणांना गट मुंबईत आला. या सर्वांची राहण्याची व्यवस्था वाशीतील नूर मशिदीत करण्यात आली.
5 मार्च – फिलिपिन्समधून आलेला हा गट वाशीतून मुंबई सेंट्रल स्थानक आणि तिथून रेल्वेमार्गे दिल्लीला गेला.
6 मार्च – दिल्लीतील एका मशिदीत त्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली
7 ते 9 मार्च – दिल्लीतील मशिदीत धार्मिक कार्यक्रमात हा गट सहभागी झाला
10 मार्च – रेल्वे मार्ग हा गट दिल्लीतून (Philippines Corona Patient Dies) मुंबईला परतला आणि पुन्हा वाशीच्या मशिदीत मुक्कामाला पोहोचला
10 मार्च – या 10 जणांच्या गटातील 59 वर्षीय व्यक्तीला श्वसनाचा त्रास होत असल्यानं डॉक्टरकडे नेण्यात आलं, तपासणीनंतर डॉक्टरांना त्यांना कस्तुरबा रुग्णालयात पाठवले
12 मार्च – तपासणी अहवालात या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं
13 मार्च – वाशी आणि दिल्लीतील या गटानं वास्तव्य केलेल्या मशिदी 14 दिवसांसाठी बंद करण्यात आल्या
14 मार्च – या गटातील इतरांनाही कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आलं, त्यातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं
17 मार्च – 59 वर्षीय बाधिताची प्रकृती खालावली, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं
23 मार्च – फिलिपिन्सच्या कोरोनाबाधिताचा मुंबईत मृत्यू

Share: