मुंबई एपीएमसीतील धान्य मार्केटच्या व्यापाऱ्याला कोरोनाची लागण.

12
0
Share:
नवी मुंबई :  मुंबई एपीएमसीतील धान्य मार्केटमधील व्यापाऱ्याला कोरोनाची लागण  झाली आहे. व्यापाऱ्यााला कोरोना झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. तसेच बाजारातील व्यापारी, माथाडी कामगार, वाहतूकदार यांच्यामध्ये भीतीचे  वातावरण आहे.गुरुवारी धान्य मार्केट मध्ये 300 ते 325 गाड्याची धान्य व डाळी चे आवक  होती आज  मुंबईला कडधान्य पुरवठा होणाऱ्यासाठी बाजारात वाहतूकदार आले होते मात्र सकाळी धान्यमार्केटचा L विंग मध्ये एका व्यपऱ्याला कोरणाचे लागण झाल्याने वाहतूकदार, माथाडी कामगार व व्यपारी 80 टक्के बाजारातून निघून गेले आहेत त्यामुळे मुंबईला कडधान्य पुरवठा मध्ये अडचण होऊ शकतो असे काही व्यपरियानी सांगितले,
नवी मुंबई महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले प्रमाणे L विंग मध्ये व्यापार करणाऱ्या व्यपारी सानपाडा पामबीच मध्ये राहत होता कोरोना पोजिटीव्ही आल्याने त्याला उपचारासाठी वाशी मनपा कोव्हीड 19 रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे ,त्याचं ट्रॅव्हल हिस्ट्री तपासणी करून त्यामध्ये कित्ती वेळा बाजारात गेला अजून कुठे गेले त्यावर आम्ही निर्णय घेणार.एका कामगारांनी सांगितले प्रमाणे कोरोनाबधित व्यपारी दोन ते तीन वेळा बाजारात आले होते त्यामुळे बाजार आवरत भितीचे वातावरण आहे।
देशात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर काही दिवसांनी बंद असलेले एपीएमसी मार्केट सुरु करण्यात आले होते. मार्केट सुरु झाल्यानंतर तेथे मोठ्या प्रमाणात ग्राहक आणि व्यापाऱ्यांची गर्दी निर्माण झाली होती. बाजारातील अनावश्यक गर्दी टाळण्याचे समितीने वारंवार आवाहन करूनही नागरिक दक्षता घेत नसल्याचे चित्र दिसत होते. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण होते.
कोरोनाच्या पार्शवभूमीवर मार्केटच्या गेटवर जाहीर सूचनेचा फलक लावण्यात आला होता. या जाहीर सुचनेत व्यापारी, अडते, दलाल, खरेदीदार ,वाहतूकदार, माथाडी कामगार आणि इतर सर्व घटकांनी आवक गेटवर उपलब्ध असलेले थर्मलचेक अप करून, सॅनिटायझर लाऊन आणि मास्क तोंडाला बांधून प्रवेश करावा. सदर सुचनेचे उल्लंघन केल्यास 1000 एवढा दंड आकारण्यात येईल आणि संबंधीबतवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं ठळकपणे सूचनेत नमूद करण्यात आलं होते.
बाजारातील गर्दी टाळण्यासाठी एपीएमसी प्रशासनाकडून रोज नवनवीन उपाययोजना सुरु करण्यात आल्या होत्या. यामध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचे आवाहनही केले होते. पण गर्दी कमी होत नसल्याने हा बाजार खारघर येथे हलवण्यात येणार असल्याचेही एपीएमसी प्रशासनाने सांगितले होते ,400 गळ्या बांधण्यात आली असून आता पर्यंत कुठल्याही व्यापार होत नाही,
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशात 170 जागेची हॉटस्पॉट  यादी जाहीर करण्यात आले आहे त्ययादीत नवी मुंबईचा समावेश आहे .नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 54 वर पोहोचली आहे. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.
Share: