Navi Mumbai police corona: कोरोनाने घेतला दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा बळी

17
0
Share:

नवी मुंबई : मागीलच आठवड्यात कळंबोली पोलीस ठाण्यात सहाय्यक फौजदाराचा या कोरोनाच्या आजाराने मृत्यू झाला होता.तसेच,नवी मुंबई पोलीस मुख्यालय आणि पनवेल वाहतूक शाखेत नेमणुकीला असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. नवी मुंबई पोलीस दलामध्ये मृत्युचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

पोलीस कर्मचारी व अधिकारी आपले कर्तव्य पार पाडत असताना अनेकांना कोरोनाशी झुंज करावे लागत आहे. त्यापैकी अनेकांनी या आजारावर विजय मिळवला आहे.काही जण अजूनही उपचार घेत आहे.पोलीस नाईक रवींद्र पाटील,52 व्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले,तसेच पोलीस नाईक संदेश गायकवाड याचे 39 व्या वर्षी कोरोनाने बळी घेतला.दोन्ही कर्मचाऱ्यांचे उपचार डी. वाय. पाटील रुग्णालयात करण्यात आले होते,पण उपचार करत असताना त्यांनी प्राण सोडले.यांच्या मृत्यूमूळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शोक व्यक्त केली आहे.

Share: