Corona Vaccine: भरतात अवघ्या 200 ते 225 रुपयात कोरोनाची लस उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार

Tehran: In this Sunday, March 1, 2020 photo, a medic treats a patient infected with coronavirus, at a hospital in Tehran, Iran. A member of a council that advises Iran's supreme leader died Monday after falling sick from the new coronavirus, becoming the first top official to succumb to the illness striking both citizens and leaders of the Islamic Republic. AP/PTI Photo(AP02-03-2020_000231A)

पुणे : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जागतिक पातळीवर कहर केला आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा कोरोना प्रतिबंधात्मक लसीकडे लागल्या आहेत. अशा परिस्थितीत सिरम इन्स्टिट्यूटच्या लस उत्पादनासंदर्भात एक महत्त्वपूर्ण करार झाला आहे. त्यामुळे आता सिरमची कोरोना लस साधारण 225 रुपयांना उपलब्ध होणार आहे. यासंदर्भात इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली.

सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाउंडेशनबरोबर महत्त्वपूर्ण करार झाला. या करारानुसार बिल गेट फाउंडेशन सिरम इन्स्टिट्यूटमध्ये तब्बल 150 मिलियन डॉलर गुंतवणूक करणार आहे. या माध्यमातून सिरम इन्स्टिट्यूट तब्बल 100 मिलियन डोस तयार करणार आहे.
भारताबरोबर मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न असणाऱ्या देशांमध्ये डोस दिले जाणार आहे. या लसीच्या एका डॉलरची किंमत ही तीन डॉलर असणार आहे. जगातील तब्बल 92 देशांमध्ये ही लस उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

लसीला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढविण्यात येईल. या माध्यमातून जास्तीत जास्त गरजवंतांना फायदा देण्याचा प्रयत्न आहे.

You may have missed