Corona virus Breaking: मुंबई एपीएमसीतील भाजीपाला व फळ मार्केट होऊ शकतो ‘कोरोना’चे हॉटस्पॉट ? व्यापारी, माथाडी कामगार व ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण,

23
0
Share:

मुंबई एपीएमसीतील भाजीपाला व फळ मार्केट ‘कोरोना’चे हॉटस्पॉट होऊ शकतो?

-नवी मुंबईत कोरोनाचे संख्या 51 वर

नवी मुंबई :आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे धारावीतील प्रत्येक नागरिकाची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे. कोरोानाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेचं हे फार महत्त्वाचं पाऊल आहे मात्र आशिया खंडातील मोठा बाजारपेठ असलेया मुंबई एपीएमसीच्या फळे व भाजीपाला मार्केटमध्ये दुसरी मोठी झोपडपट्टी पाहायला मिळाली आहे या मध्ये राहणाऱ्या हजारो कामगारांना कुठल्याही प्रकारची कोरोना चाचणी करण्यात आली नाही ,धक्कादायक बाब असा आहे कि व्यापाऱ्याने फळे व भाजीपाला बाजारात त्याचा कार्यलयात व गळ्यामध्ये परप्रांतीय कामगाराना आश्रय दिले आहे या कामगारांकडे माथाडी बोर्ड किंवा बाजारसमितीचे कुठल्याही ओळखपत्र नाही व ज्या व्यापाऱ्याकडे हे कामगार कामकरतात त्याचे कडे त्याची नोंद नाही . विंदासपणे कामगार मार्केट मध्ये वास्तव्य करीत असून मुक्तपणे फिरत दिसून येत आहे व एकत्र बसून गप्पा मारत असल्याचे चित्र दिसून येत आहे त्यामुळे बाजार आवरत समुह संसर्ग होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे . मसाला मार्केट मध्ये एका व्यापाऱ्याला कोरोनाचे लागण झाल्याने व्यापारी , माथाडी कामगार ,ट्रान्सपोर्टर व ग्राहकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे . नवी मुंबईत कोरोनाचे रुग्णांची संख्या झपाटाने वाढत आहे त्यामुळे आता नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या ५१ वर येऊन पोहोचली आहे.

तर दुसरे कडे मुंबई एपीएमसीत सर्व बाजार सुरू करण्यासाठी कोकण आयुक्त व पणन अधिकाऱ्याने जोरात कामाला लागले आहे यामध्ये असे दिसून येत आहे की काही व्यपारी आपल्या स्वार्थासाठी मंत्र्यांकडे बाजार सुरू करण्यासाठी धावपळ करत आहे मात्र त्या व्यापाऱ्याला व प्रशासनाला फळे व भाजीपाला बाजार आवारात अनधिकृत पणे राहणाऱ्या या कामगारांना आता पर्यंत कोरोना चाचणी करण्यात आली नाही.

भाजीपला व फळे बाजारात धक्कादायक प्रकार.

भाजीपाला व फळ बाजारात प्रत्येक विंग मध्ये सध्या 8 ते 10 हजार परप्रांतीय कामगार वास्तव करतात ,या पाचही मार्केट मध्ये दर दिवसात कमीत कमी 12 ते 15 हजार नागरिक ये जा करतात, असे पाहिले तर एकूण 25 ते 30 हजार लोकांची गर्दी होतात सध्या आंब्याचा सिजन मुळे अजून गर्दी होणार आहे .बाजारात येणाऱ्या व्यापारी ,ग्राहक व माथाडी कामगार मुंबई,ठाणे कल्याण डोंबिवली भागातून येतात बाजारात कुठल्याही प्रकारचा सोशल डिस्टनसिंग नसल्याने वेळोवेळी एपीएमसी प्रशासना कडून बाजार बंद करण्यात येतात त्यामुळे बाजारात समूह संसर्ग होण्याची भित्ती काही व्यपारी व माथाडी कामगार करत आहेत .

भाजीपाला व फळे मार्केट मधील दुकानावर 10 बाय 10 ची असून प्रत्येक घरांमध्ये सात ते आठ किंवा त्यापेक्षा अधिकजण रहातात. तसेच नेहमीच गर्दी असलेल्या भाजीपाला व फळ बाजारात सोशल डिस्टनसिंग कसे राखले जाणार हा प्रश्नच निर्माण झाला आहे. मसाला मार्केट मध्ये एका व्यापारीला आढळलेल्या कोरोनाच्या रुग्णामुळे व्यापारी, माथाडी कामगार,सुरक्षा अधिकारी व पोलीस यंत्रणा मध्ये भित्ती निर्माण झाले आहे .शासनाने घेण्यात आलेल्या निर्णयामुळे बुधवारपासून भाजीपला ,फळे व धान्य मार्केट सुरू करण्यात येत आहे दुर्दैवाने इथे राहणाऱ्या कामगाराला कोरनाचे लागण झाली तर पूर्ण नवी मुंबई,ठाणे ,मुंबई व कल्याण डोंबिवली कोरोनाचे विषाणू पसरू शकतो या गोष्टीकडे ठाकरे सरकार कामगारांचा आरोग्याकडे लक्ष्य द्ययला पाहीचे .

Share: