Coronavirus Death:कोरोना’मुळे भाजी विक्रेत्याचा उपचारादरम्यान मृत्यू, ‘ दादा’ आता तरी भाजीपाला बाजारपेठ बंद करा,

21
0
Share:

बारामती सारख्या मुंबई एपीएमसी होणार,’दादा ‘आता तरी बाजारपेठ बंद करा असे मागण्या व्यापारी,ग्राहक व कामगारांकडून होत आहे.

-बारामतीचे आमदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत भिलवाडा पँटर्न राबवण्याचे जाहीर केले आहे.

बारामती:कोरोना’ची लागण झालेल्या बारामतीमधील भाजी विक्रेत्या ज्येष्ठ नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. काल रात्री उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. या रुग्णाच्या मुलगा-सून आणि दोघी नातींनाही ‘कोरोना’ झाला आहे.
बारामतीत एकाच कुटुंबातल्या पाच जणांना कोरोनाची लागण झाली असून तालुक्यात कोरोनाचे आता 6 रुग्ण आहेत. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनामुळे बळी गेलेल्यांचा आकडा 73 वर गेला आहे. पुण्यात कोरोनामुळे 20 जणांचा मृत्यू झाला असून यातील एक बारामतीचा 1 आहे. त्यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु होते.

दोन दिवसांपूर्वी बारामती शहरातील समर्थनगर भागातील भाजी विक्रेत्याला कोरोनाची लागण झाली. संबंधित भाजी विक्रेता गेल्या चार महिन्यांपासून पॅरालिसीसमुळे घरातच होता. दोन दिवसांपूर्वी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्या आजूबाजूचा 5 किमीपर्यंतचा परिसर सील करण्यात आला होता.

या रुग्णापाठोपाठ त्याचा मुलगा, सून आणि दोन नातींनाही झाली कोरोनाची लागण झाली आहे. परवा मुलगा-सुनेचे अहवाल आले होते, तर काल एक आणि आठ वर्षांच्या नातीला ‘कोरोना’ झाल्याचं समजलं होतं. उपचार सुरु असताना ज्येष्ठ नागरिकाचे निधन झालं.

याआधी बारामतीत एका रिक्षा चालकाला कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्या रुग्णाशी संबंधित व्यक्तींच्या टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर बारामतीकरांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र भाजी विक्रेत्या कुटुंबाला कोरोना झाल्यामुळे पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले. आता त्याचा मृत्यू झाल्याने धाकधूक वाढली आहे.

बारामतीचे आमदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल बारामतीत भिलवाडा पँटर्न राबवण्याचे जाहीर केले आहे. सकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यात याबाबतच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. बारामतीसह राज्यात कोरोना हातपाय पसरत असतानाही नागरिकांना गांभीर्य समजत नसल्याने अजित पवार संतप्त झाले होते।

Share: