नवी मुंबईत कोरोना इफेकट:वाशी एपीएमसीत भाजीपाला व फळ बाजार पूर्णपणे बंद

18
0
Share:
नवी मुंबई: मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये धीम्या गतीने प्रसार होत आहे. मात्र तो वाढू नये, यासाठी राज्य सरकारकडून काही महत्त्वाची पावलं उचलण्यात आली आहेत. गर्दी होणाऱ्या बाजारपेठा रोटेशन पद्धतीने म्हणजेच आलटून-पालटून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Corona Virus effect on Mumbai Apmc Market)
सध्या कोरोनाचा परिस्थिती पाहता देश व राज्यपातळीवर बीबीध उपयोजन करण्यात येत आहे त्याच धरतीवर मुंबई एपीएमसी प्रशासनाने देखील दर आठवड्यातून दोन  वेळा बाजारातील साफ सफाई करून निर्जंतुकिकरण करण्याचे ठरवले आहे त्यासाठी एपीएमसी मधील फळ व भाजीपाला बाजार पूर्णपणे बंद करून बाजार आवारातील असलेल्या सर्व गाड्या वाहेर काढून बाजार आवारात निर्जंतुकीकरण करण्यात आले.
दर दिवसात कोट्यवधी रुपयांची उलाढाल बाजारात होत आहे बाजार आवारमध्ये राज्यात आणि वाहेरून शेतमालाची दिवसात 1200 ते 1500 गाड्याची आवक असतात आज पूर्ण बाजारात शुकशुकाट दिसत पाहायला मिळाली आहे .बाजार आवारात मार्केट झाल्यापासून पाहिलंदाज असे कडकडीत बंद पाहायला मिळत आहे असे प्रतिक्रिया बाजार आवारात 30 वर्षांपासून  वाहतूक करनाऱ्या एका वाहतूक दराने दिली.या सर्व प्रक्रियाची पाहणी करण्यासाठी बाजारसमितिचे सचिव व प्रशासक अनिल चव्हाण यांनी पाहणी दौरा केला त्यावेळी त्यांनी सांगितले की,कोरनाची प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाजार आवारात असलेल्या पान टपऱ्या बंद करण्यात येतील एखादी व्यक्ती बाजार परिसरात थुकने, लघुशंका करणे कीवा कचरा टाकताना आढळल्यास त्याच्यावर 1000 रुपये दंड करून कारवाई करण्यात येईल त्याच बरोबर बाजार आवारात असलेल्या अनधिकृत गोष्टी बंद करण्याचे आदेश त्यांनी उप अभियंता बिभागत दिली आहे.
बाजारात शेतकरी, ग्राहक, अडते, व्यापारी, टेम्पो चालक, हमाल, महिला कामगार यांची संख्या लक्षणीय आहे. बाजारात साधारण पंधरा ते वीस हजार लोक या ठिकाणी रोज भेटी देतात. तरही अद्याप बाजारात निर्जंतुकीकरण करण्यात आलेले नाही. बाजार समितीने याबाबत गंभीर होऊन निर्जंतुकीकरण करावे. तसेच सुट्टीच्या काळात निर्जंतुकीकरण करून घ्यावे.
-शंकर धुमाळ , वाहतूक विभाग
Share: