Corona virus update:राज्यात एकूण कोरोना रुग्णाची संख्या 1574 वर,एकाच दिवशी 210 नव्या रुग्णाची नोंद.

5
0
Share:

 मुंबई: राज्यात आज (10 एप्रिल) कोरोनाच्या 210 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यासह राज्यातील एकूण रुग्ण संख्या 1574 वर पोहचली आहे . यातील काहिसा दिलासा देणारी बाब म्हणजे आतापर्यंत एकूण 188 कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 1176 रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत कोरोना चाचणीसाठी एकूण 33 हजार 93 नमुने पाठवण्यात आले. यापैकी 30 हजार 477 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत, तर 1574 जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 188 कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 38 हजार 927 व्यक्ती घरगुती विलगीकरणात आहेत, तर 4738 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात 13 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईचे 10 तर पुणे, पनवेल आणि वसई विरार येथील प्रत्येकी 1 आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी 9 पुरुष तर 4 महिला आहेत. आजच्या एकूण 13 मृत्यूपैकी 6 जण हे 60 वर्षांवरील आहेत. 5 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील आहेत, तर दोघेजण 40 वर्षांपेक्षा लहान आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या 11 रुग्णांमध्ये (85 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत

Share: