Coronavirus Breaking: नवी मुंबईत कोरोनाचे 47 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 395 वर,एपीएमसी बनला हॉटस्पॉट..

5
0
Share:

मुंबई एपीएमसी मध्ये एकूण कोरोना बधितांची संख्या 89 वर .

नवी मुंबई :  नवी मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे आतापर्यंत नवी मुंबईत 395 कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या झाली असून चिंतेचे वातावरण आहे.
मंगळवारी महापालिकेस प्राप्त झालेल्या प्रलंबित 325 कोरोना चाचण्यांपैकी 278 अहवाल निगेटिव्ह आले असून 47 जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नवी मुंबईतील करोनाबाधितांची एकूण संख्या 395 झाली असून दिघा येथील एका कोरोना बाधितांचा मृत्यू झाली आहे .
मंगळवारी आढळून आलेले करोना रुग्णांपैकी नेरूळ-19, वाशी-, तुर्भे-5, ऐरोली-4, दिघा – 2, घणसोली- 8 व कोपरखैरणे येथील 7 रुग्णांचा समावेश आहे.
कोपरखैरणे येथे रहाणारे व एपीएमसीत भाजीपाला व्यापारी व पत्नीला कोरोनाचे लागण,वाशी मध्ये राहणारे व मुंबई मध्ये किराणा व्यापारीच्या कटुंबातील 5 जणांना कोरोनाचे लागण,दिघा येथे राहणाऱ्या भाजीपाला मार्केट मध्ये कॅश काउंटरवर काम करणाऱ्या कर्मचारीला कोरोनाची लागण.एका खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या 2 नर्स व एका रुग्णवाहिका चालकाला कोरणाची लागण,एपीएमसीत धान्य मार्केट मध्ये एका दलालला कोरोनाची लागण,धान्य मार्केटमध्ये कोरोना बाधित सेल्समनच्या संपर्कात आलेले 2 जणांना कोरोनाची लागण.महानंदा डेरी मध्ये कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेले परिवाराला 5 सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे.धान्य मार्केटमध्ये कोरोना बाधित अकाउंटंटच्या संपर्कात आलेले परिवाराला 4 जणांना कोरोनाची लागण.जुई नगर मध्ये राहणारे कोरोना बाधित मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेले 6 जणांना कोरोनाची लागण .भाजीपाला मार्केट मध्ये एका कामगाराला कोरोना पोजिटीव्ह,दिघा येथे राहणारे मुंबई मध्ये संगणक ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीच्या आज सकाळी ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात मृत्यू झाली आहे। सगळे कोरोनाबाधित रुग्ण मुंबईच्या हॉटस्पॉटमधून प्रवास करत आहेत निष्पन्न झाले आहे,तसेच मुंबई एपीएमसी मध्ये ये जा करणाऱ्या व्यपारी,ग्राहक,माथाडी कामगार असतात त्यामुळे आता एपीएमसी मार्केट मध्ये कोरोनाचे प्रादुर्भाव वाढत आहेत,एपीएमसी मध्ये रुग्ण वाढल्याने नवी मुंबईच्या नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहेत . पालिकेतर्फे विविध प्रकारच्या उपाययोजना करून सुद्धा बाजारात दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहे.नवी मुंबईतील हॉटस्पॉट आणि सगळे जास्त कोरोना पजिटीव्ही रुग्ण असलेल्या वाशी नंतर आता एपीएमसी मार्केट झाली आहे .महापालिका तर्फे 95 जागे प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आली आहे .महानगर पालिकाला चिंतेत वातावरण आहे.मुंबई मधून नवी मुंबई व एपीएमसी मार्केट मध्ये ये जा करणाऱ्या व्यापाऱ्या मूळ रुग्ण वाढली अशी प्रतिक्रिया नवी मुंबई पालिका आयुक्त आणासाहेब मिसाळ यांनी दिली आहे .

कोव्हीड 19 रुग्णची तपशील खालील प्रमाणे

-कोरोना चाचणी केलेल्या नागरिक संख्या-4702
-पोजिटीव्ही-395
-निगेटिव्ह-3228
-प्रलंबित-1126
-पजिटीव्ही ते निगेटिव्ह -48
-वाशी येथील कोरोना केयर येथील नागरिक संख्या-87
-इंडियाबुल्स मध्ये कोरोना केयर नागरिक संख्या-633
-घरातील क्वारंटइन असलेल्या व्यक्ती-6348
– वाशी येथील कोव्हीड 19 विशेष रुग्णालयात येथे दाखल-27
-कोरोनामुळे मृत्यूची संख्या-7
-कंटेन्मेंट क्षेत्र-91
-मुंबई एपीएमसी मध्ये एकूण कोरोना रुग्णची संख्या 89 वर पोहचले आहेत

Share: