Coronavirus Breaking: वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोरोना आटोक्यात येईपर्यंत  एपीएमसी मार्केट बंद करावे- आमदार गणेश नाईक

6
0
Share:
मुंबई एपीएमसी मध्ये कोरोना रुग्णची संख्या 330 वर पोहचला आहे त्यामुळे एपीएमसी मधून इतर शहरात कोरोना संसर्ग पसरणार आहे 
नवी मुंबई :नवी मुंबईत दिवसागणिक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, सद्यस्थितीत नवी मुंबईमध्ये कोरोनाबधित रूग्णांची संख्या 900 पेक्षा अधिक असून, लवकरच ती हजारांचा टप्पा गाठण्याकडे वाटचाल सुरू आहे.नवी मुंबईत मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी कार्यरत असणाऱ्या व्यक्ती व मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कार्यरत व्यक्ती यांच्यामुळे नवी मुंबई कोरोना चे संक्रमण वाढले आहे त्यामुळे जोपर्यंत नवी मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या जोपर्यंत आटोक्यात येत नाही तोपर्यंत एपीएमसी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही बंद ठेवण्यात यावी अशी मागणी ऐरोली मतदार संघाचे आमदार गणेश नाईक यांनी केली आहे.
नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.आतापर्यंत व्यापारी, माथाडी, मापाडी, कार्यालयीन कर्मचारी,सुरक्षा रक्षक, ग्राहक दलाल व त्यांचे निकटवर्तीय यांना कोरोना ची बाधा झाली आहे. एपीएमसी मार्केट मधून कोरोना संक्रमण झालेल्यांची संख्या 330 वर येऊन पोहोचली आहे तसेच मुंबईतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत मात्र नवी मुंबईत राहणाऱ्या 294 लोकांनाही कोरोना संक्रमण झाले आहे. त्यामुळे मुंबईत कामासाठी जाणाऱ्या अत्यावश्यक सेवेत कार्यरत व्यक्तींची सोय कामाच्या ठिकाणी करण्यात व  नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रित व्हावी ही मागणी जोर धरू लागली आहे.त्या अनुषंगाने एपीएमसीमध्ये कोरोनाचा वाढता प्रसार पाहता 11 मे ते 17 मे यादरम्यान एपीएमसी मधील पाचही मार्केट बंद ठेवण्यात आलेले आहेत,त्यानंतर सात दिवस झाल्यावर पुन्हा मार्केट सुरू करण्यात येणार आहे. मात्र जोपर्यंत नवी मुंबईतील कोरोना बाधीतांची संख्या जोपर्यंत नियंत्रणात येत नाही तोपर्यंत एपीएमसी मार्केट बंद ठेवण्यात यावे अशी मागणी नवी मुंबईतील ऐरोली मतदार संघाचे आमदार गणेश नाईक यांनी केली आहे.
Share: