Coronavirus Breaking: APMC मार्केटमध्ये 12 जणांना कोरोनाची लागण.

19
0
Share:

-नवी मुंबईत आतापर्यंत 188 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 5 कोरोनाबाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

 

नवी मुंबई : मुंबई एपीएमसी मध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एपीएमसी प्रशासनाने मार्केटच्या प्रवेशद्वार वाहेर सोशल डिस्टनसिंग साठी बॅरिकेट लावण्यात आली आहे ,प्रवेश गेटवर सैनिटायझर करून गाड्या आत प्रवेश करण्यात येत आहे मात्र मार्केटच्या आत प्रवेश केल्यावर व्यपारी व ग्राहकांच्या गर्दी पाहायला दिसून येत आहे त्यामुळे सोशल डिस्टनसिंगची ऐसी तैशी होऊन कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे.

एपीएमसी येथील कांदा बटाटा,भाजीपाला, फळ, मसाला आणि धान्य मार्केट सुरु आहे. टर्मिनल मार्केट असल्याने येथे मोठ्या प्रमाणात ग्राहक ये जा करत आहेत त्यामुळे गर्दी होत आहे. त्यामुळे येथेही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. एपीएमसी मार्केटमध्ये (27 एप्रिल) एका भाजीपाला मार्केटमधील व्यापाऱ्याला आणि फळ मार्केटमधील सुरक्षा अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. तर (28 एप्रिल) एपीएमसी धान्य मार्केटमधील एका व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे त्याच वरोवर मसाला मार्केट मध्ये हॉटेलवर काम करणाऱ्या कोरोना बाधित वेटरच्या संपर्कात आलेल्या 6 जणांना कोरोना रुग्ण आढल्याने आता मार्केट मध्ये कोरोना रुग्णाची संख्या 12 वर गेला आहे.

कोरोनाबाधित होणाऱ्या व्यापारी धान्य मार्केटच्या G विंगमध्ये व्यापार करत होता. हा व्यापारी कोपरखैरानेमधील रहिवासी आहे. याआधी L विंगमधील व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यासोबत मसाला मार्केटमधील व्यापाऱ्याला, एका हॉटेल कर्मचाऱ्याला आणि त्याची संपर्कात आलेले 6, एका भाजीपाला व्यापाऱ्याला आणि फळ मार्केटच्या सुरक्षा अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे.
मुंबई एपीएमसीमध्ये आता कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. दोन दिवसात मुंबई एपीएमसीमधील भाजीपला व्यापारी, फळ मार्केटमधील सुरक्षा अधिकारी आणि धान्य मार्केटच्या व्यापाऱ्याला कोरोनाची लागण त्याच वरोवर मसाला मार्केट मध्ये हॉटेल कर्मचाऱ्या कोरोना बधितांची संपर्कात आलेल्या 6 जणांना कोरोना रुग्ण आढल्याने बाजारात खळबळ उडाली आहे. त्यामुळे येथे काम करणाऱ्या माथाडी कामगार, ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एपीएमसीमध्ये कोरोनाचा गुणाकार सुरू झाल्याने नवी मुंबईकरांना डोकेदुखी वाढणार आहे. सध्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यापारी, दलाल, ग्राहक, माथाडी कामगार आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची तपासणी करण्याचे काम पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सुरू झाले आहे.
नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नवी मुंबईत आतापर्यंत 188 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 5 कोरोनाबाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

Share: