Coronavirus Breaking:मुंबई एपीएमसीत भाजीपाला,फळ,धान्य व मसाला मार्केट मध्ये व्यपारी व सुरक्षा अधिकारीला कोरोनाचे लागण.

6
0
Share:
-मुंबई एपीएमसीत मार्केट बनतो कोरोना टाईम बाॅंब.
-मुंबई एपीएमसीत भाजीपाला,फळ,धान्य व मसाला मार्केट मध्ये व्यपारी व सुरक्षा अधिकारीला कोरोनाचे लागण
-शहरातला कोरोनाग्रस्तांचा आकडा 145 वर.
मुंबई एपीएमसी मध्ये ” समूह संसर्ग “रोखणे आवश्यक
नवी मुंबई – आशिया खंडातील मोठा बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती कोरोनाचा टाईम बॉम्ब बनली आहे.  भाजीपला व फळ मार्केट मध्ये 2 कोरोना रुग्णआढल्याने  व्यपारी, ग्राहक , माथाडी कामगार व सुरक्षा रक्षक यांच्यात भिती पसरली  आहे .
काही दिवसांपूर्वी  मसाला मार्केट मध्ये एक व्यापारी  व एक हॉटेल कर्मचारी, धान्य मार्केट मध्ये एक व्यापाऱ्याला  कोरोनाची लागण झाली होती. अवघ्या काही दिवसातच त्यात वाढ होऊन  रुग्णांचा आकडा  पाचवर गेला आहे. बाजार आवारात व्यापाऱ्यांकडून माल जास्त प्रमाणात  मागवून वाढीव दराने विक्री होत असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे  बाजार आवारात मोठ्या  प्रमाणात गर्दी वाढत असून त्यांच्याकडून सोशल डिस्टनसिंगचे बारा वाजत आहे. म्हणून पाचही बाजार  बंद करण्यात आले होते.
दरम्यान कोकण आयुक्त शिवाजी दौंड ,एपीएमसी प्रशासक व सचिव अनिल चव्हाण यांनी बाजार सुरळीत करण्यासाठी आणि मुंबईत कड धान्य व भाजीपाला पुरवठा करण्यासाठी व्यापाऱ्यांसोबत  बैठक घेतली.  त्या बैठकीत पालकमंत्री एकनाथ शिंदे,माथाडी नेता नरेंद्र पाटील होते. त्याचवेळी व्यापाऱ्यानी सांगितले की आम्ही कमी माल मागवणार  आणि सोशल डिस्टनसिंग पालन  करणार.   प्रत्यक्षात मात्र  जास्त माल मागवला जात होता.  तर  बाजारात सकाळी गर्दी सुरू झाली होती,काही व्यापाऱ्यानी  एपीएमसीच्या कर्मचाऱ्यांना हाताशी  धरून अर्थकारण करून  गेटपास वाटप करण्यात आले.
भाजीपाला  व फळ मार्केट मध्ये खरेदीदार व मार्केट मध्ये राहणाऱ्या लोकांसाठी हजारो ओळख पत्रांचे  वाटप करण्यात आले आहे, एपीएमसी प्रसाशन कडून बाजारात गर्दी रोखण्यासाठी किरकोळ विक्री बंद करण्यात आली मात्र काही व्यापारी  किरकोळ व्यापार छुप्या मार्गाने  करत आहेत ,भाजीपला बाजारात  E विंग मध्ये एका व्यापाऱ्याला  कोरोना लागण झाल्याने विंग सील करण्यात आली आहे ,फळ व भाजीपला बाजारात व्यापाऱ्या कडून गाळ्यात  अनधिकृत पणे वाढीव बांधकाम करून बाजारात काम करणाऱ्या परप्रांतीय कामगार व स्टॉल व हॉटेलवर काम करणाऱ्या कर्मचारी ठेवून त्याचा कडून पैसे घेतला जातात ते सगळे बाहेर  फिरून बाजारात प्रवेश करतात.
भाजीपला,फळ,धान्य मार्केट मध्ये येणाऱ्या व्यपारी व ग्राहक मुंबई,ठाणे कल्याण डोंबिवली भागात हॉटस्पॉट मधून येतात. त्यांच्यापासून  कोरोना पसरून  ‘समूह संसर्ग’ होऊ शकतो. यांची ट्रॅव्हल हिस्ट्री मिळवणे  कठीण आहे । फळ मार्केट मध्ये 4 दिवसापासून 2 लाख हापूस आंब्याचा पेट्याची आवक झाली आहे या मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला दिसून येत आहे. फळ मार्केट मध्ये सुरक्षा अधिकारीला कोरोनाचे लागण झाल्याने त्या सुरक्षा अधिकारी सोबत काही व्यापारी,सुरक्षा कर्मचारी, एपीएमसी प्रशासन संपर्कात होते सुरक्षा अधिकारीला  कोरोना लागण झाल्यावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे।
11 एप्रिलला धान्य मार्केटच्या L विंग मध्ये एका व्यापाऱ्याला कोरोनाचे लागण झाल्यावर विंग पालिकेकडून सील करण्यात आले होते मात्र मार्केट मध्ये काही व्यपारी ग्रोमाचे पदाधिकारी मिळून नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांना भेटून  सांगितले की कंटेन्मेंट झोन उघडला  नाही तर आम्ही पूर्ण मार्केट बंद करू असे धमक्या काही व्यापारी कडून देण्यात आले होते .
नवी मुंबईत कोरोना संसर्गजन्य महामारी रोखण्यासाठी प्रशासन तर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहे. दुसरीकडे काही व्यापारी आपल्या स्वार्थासाठी कोरोनाचे नावाने जास्त माल मागवून भाव वाढवुन विक्री करण्याच्या कट रचत आहेत. त्यामुळे सोशल डिस्टनसिंग नसल्याने बाजारात कोरोना पसरण्याची भीती  नवी मुंबईकरांना लागली आहे.
Share: