CoronaVirus | हवेतूनही पसरू शकतो कोरोना,कसा कराल स्वतःचा बचाव

7
0
Share:

नवी दिल्ली : हवेच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होत असल्याची धक्कादायक माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली. काही वैज्ञानिकांनी याचे पुरावे जमा केले आणि WHO ला नव्यानं दिशा निर्देश द्यायला सांगितलं आहे .

वैज्ञानिकांचा हवेतून कोरोना पसरतो हा दावा जागतिक आरोग्य संघटनेनं स्वीकारला आहे. सार्वजनिक ठिकाणी, गर्दीत, अरुंद जागी कोरोना वेगाने पसरत असल्याचं दिसून आलं आहे. 32 देशातल्या 239 शास्त्रज्ञांनी हवेतून कोरोना पसरत असल्याचे पुरावे गोळा केले आहेत.

नव्या शोधामुळे आता सोशल डिस्टन्सिंगचे नियमही बदलले जाण्याची शक्यता आहे. जागतिक आरोग्य संघटना याबाबत लवकरच नवे नियम जाहीर करणार आहेत .

“कोरोना विषाणू हवेत राहाण्याचा आणि हवेतून पसरण्याची शक्यता नाकारता येणार नाही. विशेषकरुन गर्दीच्या ठिकाणी हवा चांगली नसते, तिथे हवेतून कोरोना पसरु शकतो”, असं WHO च्या टेक्निकल हेड Maria Van Kerkhove यांनी सांगितलं.

याप्रकरणी तज्ज्ञांचं मत घेतलं जाईल आणि याबाबत लवकरच नवे नियम जाहीर करण्यात येईल, असं WHO ने सांगितलं. तज्ज्ञांच्या मते, जर कोरोना विषाणू हवेतून पसरत असेल, तर मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करावं लागेल. पण, 1 मीटरचं अंतर आणखी वाढवण्याबाबत विचार केला जाऊ शकतो.

आतापर्यंत हेच मानलं जात होतं की, एखाद्या व्यक्तीच्या शिंकण्याने किंवा खोकलण्याने किंवा त्याला स्पर्श केल्याने दूसऱ्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होतो. मात्र, आता कोरोनाचे कण हवेतही असू शकतात, असं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता लोकांना आणखी जास्त सावध राहण्याची गरज आहे.

Share: