CoronaVirus: कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिकेचा ‘मिशन ब्रेक द चैन ‘ या नावाचा उपक्रम राबवण्याचा निर्णय – अभिजित बांगर

6
0
Share:
नवी मुंबई:नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोविड 19 च्या संदर्भात अनेक पावल उचलली जात आहे.आणि महानगर पालिकेचे सर्व अधिकारी , कर्मचारी , मेडिकल स्टाफ, 24 तास आणि रात्रंदिवस आपली कामगिरी चोख पार पाडताना दिसून येत आहे. याचवेळी कोविड ची परिस्थिती पाहिली तर त्या परिस्थितीच्या अनुषंगाने रोज वाढणारी संख्या, कंटेन्मेंट  आणि ऍक्टिव्ह पेशंटची संख्या लक्षात घेतली तर आपण मोठ्या प्रमाणात राबवणे गरजेचे आहे .ज्यातून चैन ऑफ इन्फेक्शन जे आहे ते ब्रेक करता येईल.
त्यामुळे महानगरपालिकेने ‘मिशन ब्रेक द चैन ‘ या नावाचा उपक्रम राबवण्यात आला आहे. त्या मार्फत काही उपक्रम असतील तर त्यात शॉट टम , मिडीयम टम आणि काही लॉंग टम असतील असा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्व प्रथम 31 जुलै पर्यत हॉटस्पोर्ट एरियामध्ये लॉक डाऊन वाढवण्यात आला आहे. ज्या ठिकाणी लॉक डाऊन वाढवला आहे त्या ठिकाणी मोठया प्रमाणात 10 दिवस सरविल्नस आणि स्क्रिनिंग ची कारवाई केली जाईल. या माध्यमातून जास्तीत जास्त तपासकरण आणि त्यांच्यापैकी कोणी पॉझिटिव्ह असेल तर त्याची ट्रीटमेंटसाठी लागणारा कालावधी व्यथित नाही झाला पाहिजे. यासाठी ‘मिशन ब्रेक द चैन’ हे मिशन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाच म्हणजे आपला टर्न अराउंड टाइम जो आहे तो कमी करण्यासाठी  अँटीजन च प्रमाण वाढवलं आहे.जेणेकरून नागरिकांना लगेच रिझल्ट मिळू शकतो.. नागरिकांच्या सहकार्यातून आणि कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून मिशन ब्रेक द चैन यामध्ये आपण यशस्वी होऊ अस  अभिजित बांगर सांगितले..
नवी मुंबईत करोनाबाधितांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होत असून मृतांची संख्याही दररोज वाढत आहेत. वाढत्या संसर्गामुळे शहरात आज 303 नवे रुग्ण वाढले असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
शहरात करोनाबाधितांची एकूण संख्या 12,269 झाली आहे. तर आज 6 जणांचा करोनामुळं मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या 358 झाली आहे. शहरात आतापर्यत तब्बल 7,925 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी शहरात प्रतिजन चाचणीला सुरुवात केली आहे. बांगर यांच्यासमोर शहरातील करोना प्रादुर्भाव रोखण्याचे मोठे आव्हान आहे.
Share: