Coronavirus update| राज्यात नव्या कोरोनाबाधितांचा उच्चांक, दिवसभरात 3 हजार 827 नवे रुग्ण

6
0
Share:

राज्यात नव्या कोरोनाबाधितांचा उच्चांक, दिवसभरात 3 हजार 827 नवे रुग्ण

मुंबई : राज्यात आज (19 जून) दिवसभरात 3 हजार 827 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 24 हजार 331 वर पोहोचली आहे. राज्यात आज दिवसभरात 1 हजार 935 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत एकूण 62 हजार 773 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली .

राज्यात आतापर्यंत 5 हजार 893 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

आज दिवसभरात राज्यात 142 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोना बळींची संख्या 5 हजार 893 वर पोहोचली आहे. तर सध्या राज्यात 55 हाजार 651 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

राज्यात कोरोनाग्रस्त दुप्पट होण्याचा कालावधी 26 दिवसांवर

“राज्यात रुग्ण वाढीचा वेग कमी होत असून रुग्ण दुप्पट होण्याचा (डबलिंग रेट) कालावधी वाढत आहे. सध्या हा कालावधी सुमारे 26 दिवसांवर गेला आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 50.49 टक्के एवढा आहे”, अशी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली (Maharashtra Corona Total Casesकोव्हिड-19 चाचण्यांची क्षमता वाढवण्यासाठी ससून रुग्णालयाला 12 कोटी 44 लाखांचा निधी मंजूर : अजित पवार).

राज्यात 5 लाख 91 हजार 049 लोक होम क्वारंटाईनमध्ये

राज्यात 5 लाख 91 हजार 049 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 25 हजार 697 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत

Share: