भीषण अपघात:अरेंजा सर्कल सिग्नलवर टेम्पोने वेस्ट बसला धडक दिल्याने तिघे जखमी,

20
0
Share:
-लॉक डाऊन मुळे शुकशुकाट असलेल्या रस्त्यावर टेम्पोने वेस्ट बसला धडक दिल्याने तिघे जखमी  वाहेन सिग्नल जम्प करून गाड्या चालवतात त्यामुळे अपघात होत आहे 
नवी मुंबई-देशात लॉकडाऊन सुरू असले तरी अत्यावश्यक सेवा सुरूच आहे. या काळात कर्तव्य बजावणाऱ्या वेस्ट बसच्या गाडीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका टेम्पोनी धडक दिल्याने अपघात झाला. यात पोलिस  कर्मचाऱ्यांसह टेम्पोवरील चालकही जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून याबाबत अधिक तपास एपीएमसी पोलिस करीत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी साडे सात वाजता वाशी येथील अरेंजा कॉर्नर येथे वेस्ट बस वाशी कडून खारघर कडे जात होते बस मध्ये अत्यावस्यक सेवा मध्ये कांमकरणाऱ्या कर्मचारी देखील उपस्थित होते . याचवेळी जैविक कचरा उचळणाऱ्या टेम्पो सिग्नल तोडून वेस्ट बसला समोरून जोरदार धडक दिल्याने बस टेम्पोला विरुद्ध दिशेने  50 मीटर पर्यंत वेगाने गेले . यात वेस्ट बस मधील असणाऱ्या चालक व पोलीस कर्मीचा वरोबर टेम्पो चालक  जखमी झाले.
या अपघातात टेम्पो चालक अडकला होता त्यांना वाशी अग्निशमन कर्मचाऱ्यांनि गॅस कटर साहाय्याने वाहेर काढले आणि खासगी रुग्णालयात उपचारासाठी तात्काळ दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलिस स्टेशनचे अधिकाऱ्यांनी  तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दोन्हीही वाहने एपीएमसी पोलिस स्टेशनला जमा करण्यात आली आहेत.
Share: