मुंबई APMC येथील उप अभियंता मेहबूब बेपारी अडचणीत

9
0
Share:

मुंबई APMC येथील उप अभियंता मेहबूब बेपारी अडचणीत,खोटे कागदपत्र दाखल करून एपीएमसी मध्ये नियुक्ती मिळवल्याने न्यायालयाने एपीएमसी पोलीस ठाण्यात मेहबूब बेपारीवर तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे,

नवी मुंबई:वाशी येथील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिति मध्ये भर्ती कायद्याचे उल्लंघन करून फर्जी अनुभवपत्र आणि फर्जी दस्ताएवज वरुन जूनियर अभियंता या पदावर करण्यात आलेली नियुक्ति घोटाळेच्या भांडाफोड झाला आहे. ही माहिती संतोष यादव यांनी दिली आहे. चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेली ही भर्ती व नियुक्तिमुळे लाभान्वित झालेले एपीएमसीचे उप अभियंता मेहबूब बेपारिवर वाशी न्यायालयात यादव यांनी पुरावे आणि माहिती सादर केली होती त्या अनुशंगाने न्यायालयाने मेहबूब बेपारी यांच्यावर या कलमा अंतर्गत 420,467,468 गुन्हा केल्याची स्पष्ट होते, न्यायालयाने पोलीस ठाण्यात पूर्ण तपासणी करून अहवाल सादर करण्यासाठी आदेश दिले आहे,उप अभियंता बेपारी यांच्यावर न्यायालयाने दिलेल्या आदेशावर एपीएमसी बाजार समितित खळबळ माजली आहे.

यादव यांनी सांगितल्या प्रमाणे जूनियर अभियंता (सिविल) या चार पदांवर भर्ती व नियुक्ति साठी दिनांक 07.06.1997 रोजी वर्तमानपत्रा मध्ये एपीएमसीच्या वतीने जाहिरात छापण्यात आली होती. मात्र या जाहिरातमध्ये चार वर्षाच्या अनुभव ठेवलेले आणि भर्ती व नियुक्तिची सर्व नियमांची पूर्ति करणारे आवेदकांना ही नौकरी देण्याचा उल्लेख होता. संतोष यादव यांच्या  सांगण्यावरून नियमांची उल्लेख केल्यानंतर सुद्धा बोगस कागजात आणि काही पेपरच्या आधारे अपात्र आवेदकांना नौकरी देण्यात आली होती त्यामुळे या भर्ती मध्ये मोठा घोटाळा झालेला असून
मेहबूब के बेपारी यांची कनिष्ठ अभियंता या पदावर नियुक्ती झालेली होती मात्र या पदावर नियुक्ती होण्यासाठी एपीएमसीच्या काही नियम व अटी होत्या विशेष म्हणजे या पदासाठी पदवीधर आणि तीन वर्षे अनुभव , तसेच पदविका आणि चार वर्षाचे अनुभव, आणि दुतीयश्रेणी उत्तीर्ण प्राप्त असलेल्या व्यक्तीलाच या पदाचा हक्क आहे मात्र मेहबूब के बेपारी यांनी या नियमांचे उल्लंघन केला आहे। मेहबूब बेपारी यांनी 1996 साली कलंबोली येथील mgm कॉलेजला शिक्षण घेत असतानाच तीन वर्षे नोकरी करून तृतीय श्रेणी मधून उत्तीर्ण झालेले होते तरीसुद्धा मेहबूब बेपारी यांनी आपण दुतीय श्रेणी मध्ये पास होऊन 3 वर्षाचा अनुभव आहे अशी खोटी कागदपत्रे एपीएमसी बोर्डामध्ये सादर करून बोर्डाची तसेच कायद्याचेही उल्लंघन केले आहे अशी माहिती संतोष यादव यांनी दिली आहे। ऍड संतोष यादव सांगितले प्रमाणे सुभाष पाटील ( मा सह निबंधक महाराष्ट्र शासन ) यांच्याकडून 2018 साली चौकशी करण्यात आली असून कमिटीच्या रिपोर्ट मध्ये मेहबूब बेपारी यांच्या विषयी पुरावे सिद्ध झाले होते तरी सुद्धा यावर एपीएमसी प्रशासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नव्हते, मेहबूब बेपारी यांनी केलेला गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने यावर कोर्टामध्ये दिलेल्या माहितीनुसार मेहबूब बेपारी यांच्या घोटाळ्याचे प्रकरण समोर आलेल आहे.

Share: