मुंबई एपीएमसी प्रशासनातर्फे कामगारांना जेवणाची व्यवस्था.

22
0
Share:

मुंबई एपीएमसी प्रशासनातर्फे कामगारांना जेवणाची व्यवस्था

नवी मुंबई:सध्या सुरु असलेल्या देशव्यापीच्या काळात कोरोना विषाणूबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून संपूर्ण देशभरात लॉकडाऊनचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. घराबाहेर पडता येत नसल्यामुळे कामगारांना उपासमारीची वेळ आली आहे तसेच हाथावर पोट असणाऱ्या गरीब व गरजू वंचित वर्गातील नागरिक तसेच नाका कामगार यांची उपासमार होऊ नये यासाठी रोजच्या शेकडो नागरिकांना जेवणाची व्यवस्था व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची तयारी कोकण आयुक्त शिवाजी दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसी बाजार प्रशासनने बाजार आवारात सुरु केली आहे.

सोशल डीस्टन्सिंगपेक्षा सामाजिक बांधिलकीचा परिचय या निमित्ताने घडून आलेला पाहायला मिळत आहे. तसेच शहरातील पोलीस बांधवांना देखील अन्नदान व पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या वाटप करण्यात आले असल्याचे दिसून येत आहे.

Share: