पावसामुळे हळद पिकावर रोग, पानगळचा प्रादुर्भाव

23
0
Share:

पावसामुळे हळद पिकावर रोग, पानगळचा प्रादुर्भाव

सतत पडत असलेल्या पावसाचा फटका हळदीला बसला आहे. हळदीवर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तर कंदकुज होण्याची शक्यता आहे. परिणामी हळदीच्या उत्पादनात ३० टक्के उत्पादन घट होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात १ हजार ३०० हेक्टरवर हळदीची लागवड आहे. अक्षय तृतीयापासून हळद लागवडीला सुरवात होते. ऑगस्ट महिन्यात चार महिन्याचे पीक होते. ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी आणि शेतात साचलेल्या पाण्यामुळे हळदी पिकाचे नुकासन झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. हळद पीक सहा महिन्यांचे झाले आहे. हा कालावधी हळद पीकवाढीचा असतो. त्यामुळे हा पाऊस हळद पिकाला अनुकूल नाही.

यामुळे आर्दता वाढल्याने तांबेरा रागोचा प्रादुर्भाव होण्यास सुरवात होते. पाऊस राहिल्याने मुळांना हवा मिळत नाही. त्यामुळे कंदकुज होण्यास प्रारंभ होते.

या वातावरणामुळे बहुतांश भागात हळदीवर तांबेरा आढळून येत आहे. गेल्यावर्षी हळदीला अपेक्षित दर मिळाले नाहीत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी हळद लागवड केली नाही. अजून पाऊस सुरूच आहे. त्यामुळे शेतात पाणी साचले आहे. सध्या हळदीच्या उत्पादनात ३० टक्के घट होण्याची शक्यता आहे.

पाऊस कमी झाल्यानंतर किती टक्के कंदकुज झाली आहे, याची माहिती पुढे येणार आहे. त्यामुळे उत्पादनात अधिक घट होण्याची शक्यता हळद संशोधन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. प्राथमिक यामुळे या पावसामुळे हळदीच्या उत्पादनात ३० टक्के घट होण्याची शक्यता आहे.

Share: